मोदी सरकारच्या नावे चिट्ठी लिहिलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशीही शवागारातच

0
11

यवतमाळ(विशेष प्रतिनिधी),दि.12ः- मोदी सरकारच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशीही नातेवाईकांनी ताब्यात घेतला नाही. यावर तोडगा काढण्यासाठी राजूरवाडी येथे महसूल राज्यमंत्री,विभागीय आयुक्तासंह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पोहोचले आहेत.त्यापुर्वी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांना घाटंजी पोलीस ठाण्यातून राजूरवाडी येथील चायरे यांच्या निवासस्थानी चर्चेसाठी नेण्यात आले.
घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर भाऊराव चायरे यांनी मंगळवारी गळफास आणि नंतर विष प्राशन करून आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आत्महत्येस नरेंद्र मोदी सरकार जबाबदार आहे, असे लिहिले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात आणला. एक कोटीची आर्थिक मदत आणि मुलीला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी करत मृतदेह घेण्यास नकार दिला होता. शुक्रवारी दुपारपर्यंत हा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारातच ठेऊन होता. दरम्यान, यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या. परिवारासोबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी महसूल राज्यमंत्री संजय राठोड,  अमरावती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक,काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार नाना पटोले राजूरवाडी येथे दाखल झाले.या चर्चेत मात्र यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांना दूर ठेवण्यात आले आहे.तर मुख्यमंत्र्यानी यवतमाळला येऊन त्या कुटुबिंयाचे सांत्वन करण्यापेक्षा उमरखेड येथील कार्यक्रम महत्वाचा मानल्याने त्यांच्यावर जोरदार टिका सुरु झाली आहे.या या प्रश्नावर सुरवातीपासून आंदोलन करणारे शेतकरी न्याय हक्क समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यांनाही पोलीस ठाण्यातून चचेर्साठी राजूरवाडी येथे नेण्यात आले.त्यातच उमरखेड येथे स्वामिनीच्या कार्यकर्त्यांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले.त्यावर मुख्यमंत्र्यांना उदघाटनाला वेळ मिळतो पण आंदोलंकाशी चर्चा करयाला नाही अशी टिका स्वामिनिचे मुख्य सयोजंक महेश पवार यांनी केली. वृत्तलिहिपर्यंत यासंदर्भात कोणताही तोडगा निघाला नव्हता. परिणामी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारातच ठेऊन होता.

नरेंद्र मोदी आणि सरकारवर ३०२ कलम अन्वये गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही. तोपर्यंत मी यवतमाळ जिल्हा सोडून जाणार नाही असे ठाम भूमिका नाना पटोले यांनी घेतली आहे. आज भंडारा जिल्ह्यातून माजी खासदार नाना पटोले यांनी यवतमाळला जाऊन शंकर चायरे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या परिवाराची सांत्वन भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.मुख्यमंत्री यवतमाळ नजीकच्या उमरखेडला कार्यक्रमात येण्याचे ठरवतात मात्र जवळचं असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याबाबात काही विचार करीत नाही आणि साधी भेट सुद्धा घेत नाही.३ दिवस लोटून सुद्धा या मृत शेतकऱ्याच्या परिवाराला येथील पालकमंत्री, आमदार, खासदार आणि भाजपच्या एकाही नेत्यांने सांत्वना भेट दिली नाही. अद्यापही त्या शेतकऱ्यांचा शवविच्छेदन झाले नाही. जो पर्यंत सरकारविरोधात गुन्हा नोंद होत नाहो आणि कारवाई होत नाही तो पर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही असी भूमिका या शेतकऱ्याच्या परिवाराने घेतली आहे.