डॉ.आंबेडकर जंयती सोहळ्याला शेहला रशीद व मोहित पांडे येणार

0
10

गोंदिया,दि.12: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त पं.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने १३ एप्रिल रोजी तहसिल कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशेजारी भव्य जयंती समारोहाचे आयोजन सायकांळी ४ वाजता करण्यात आले आहे. जेएनयु विद्यार्थी नेता शेहला रशीद व जेएनयु विद्यार्थीसंघ माजी अध्यक्ष मोहित पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याचे उदघाटन होणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष धीरजकुमार मेश्राम राहणार आहेत.
१४ एप्रिलला प्रा.विमल किर्ती मार्गदर्शन करणार आहेत. मुख्य अतिथी म्हणून मुख्याधिकारी चंदन पाटील,डॉ.प्रशांत मेश्राम,डॉ.घनश्याम तुरकर,अनिल सुखदेवे,जयकुमार इंगोले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सयोंजक संजय भाष्कर,अध्यक्ष धिरजकुमार मेश्राम,देवेंद्र रुसे,अमित भालेराव,दिपेंद्र वासनिक,निलेश देशभ्रतार,राहुल बनसोड,सुशील ठवरे,मिलींद गणवीर,सुर्यकांत डोंगरे,राजेश भोयर,बंसत गणवीर,लक्ष्मीकांत डहाट,दिपिका रुसे,लक्ष्मी राऊज,ज्योती डोंगरे,लक्ष्मीकांत डहाट,मामा बनसोड यांनी केले आहे.