रविकांत तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

0
18

पुणे येथील राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत खा. राजू शेटृी यांनी केली घोषणा
पुणे,दि.13: स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी स्वाभिमानीचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांची निवड करण्यात आली. पुणे येथे झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या व पक्षाच्या राज्यकार्यकारीणीच्या बैठकीत खा. राजू शेटृी यांनी ही घोषणा केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यकार्यकारीणीची महत्वपुर्ण बैठक पुणे येथे 11 व 12 एप्रिल रोजी संपन्न् झाली. या कार्यकारीणीच्या बैठकीला राज्यभरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे व पक्षाचे पदाधिकारी मोठया संख्येनी उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या या बैठकीत महत्वाच्या विषयावर मंथन करण्यात आले. आगामी 2019 च्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणूकांवर प्रामुख्याने या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे व पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेटृी यांनी स्वाभिमानीचे राज्याचे नेते रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. या निवडीची खा. शेटृी यांनी घोषणा करताच सभागृहात टाळयांचा कडकडाट झाला. त्यांच्या निवडीचे उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले.
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्हयात स्वाभिमानी शेतकरी संघटना उभी करून संघटना वाढीसाठी कठोर परिश्रम घेतले. सावळा या छोटयाशा गावात जन्मलेले रविकांत तुपकर यांनी कॉलेज जिवनापासून तरुणांना सोबत घेवून शेतकरी पुत्रांच्या हक्कासाठी सुरूवातील लढा उभा केला. गावातील पाणी टंचाई असो की, शेतकऱ्यांच्या छोटया मोठया समस्या असोत त्या प्रशासना पर्यंत पोहचवून सर्वसामान्य् माणसांना न्याय देण्यासाठी तुपकर यांनी आक्रमकपणे आंदोलने सुरू केले. पुढे ते शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या संपर्कात आले. एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून तुपकरांची ओळख निर्माण झाली होती. या पोरामध्ये नेतृत्वाचे गुण असल्याचे हेरून शरद जोशी यांनी रविकांत तुपकर यांना संघटनेत काम करण्याची संधी दिली. या संधीचे सोनं करीत तुपकर यांनी पाठीशी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना प्रस्थापित राजकीय पक्ष व नेत्यांना शह देत बुलडणा जिल्हयात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा देणे सुरू केले. त्यांच्या या आक्रमक व आगळया वेगळया आंदोलनामुळे प्रशासन व शासनकर्त्यांना जेरीस आणले होते. पुढे “रविकांत तुपकर आणि आंदोलन” असे समिकरण निर्माण झाले. नंतरच्या काळात राजू शेटृी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यावेळी ते राजू शेटृी यांच्या सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत दाखल झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांची अनेक आंदोलने चांगलीच गाजले. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेतील कोटयावधी रूपयाचा घोटाळा उघडकीस आणून रविकांत तुपकर यांनी तत्कालीन सत्ताधारी पक्षाचे व विरोधी पक्षांच्या नेत्यांना सळोकी पळो करून सोडले होते. प्रस्थापित नेत्यांना त्यांनी चांगलाच घाम फोडला होता.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानीने भाजपशी संगत केली. तर भाजपने रविकांत तुपकरांच्या माध्यमातून स्वाभिमानीला पहीला लालदिवा दिला. तथापि हे सरकार शेतकऱ्यांचे पश्न् सोडवू शकत नाही. हे लक्षात येताच स्वाभिमानीने भाजपशी काडीमोड घेतला. तेव्हा रविकांत तुपकर यांनी लालदिव्याला लाथ मारून खा. राजू शेटृी यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला.प्रभावी वक्ततृत्व आक्रमकपणा व वैचारिक बैठक पक्की असल्याने तुपकरांची महाराष्ट्रात सध्या क्रेझ वाढली आहे. आजही तुपकरांच्या सभेला राज्यभरात तरुणांची प्रचंड गर्दी होते. सदाभाउ खोत यांनी केलेल्या बंडामुळे खोतांची पक्षातून हाकलपटृी करण्यात आली होती. त्यानंतर रविकांत तुपकर यांच्यावर पक्षांच्या जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. खा. राजू शेटृी यांचे अत्यंत विश्वासु सहकारी म्हणुन ओळखले जातात. शेट्टी व खोत यांच्या यादवी मध्ये तुपकरांनी संघटना एकसंघ ठेवण्याचे काम केले आता खा. राजू शेटृी यांनी त्यांना ऐन 2019 च्या निवडणुकांच्या तोंडावर राज्यामध्ये प्रमोट करून एक नविन खेळी खेळली आहे.खा.शेट्टी हे तुपकरांना माढा किव्हा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून उतरविण्याची तयारी करत आहे. त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.