घर पीडितांना शासनाची ४0 लाख ८0 हजारांची मदत

0
11

आमगाव,दि.13ः-सन २0१६ मध्ये तालुक्यात झालेल्या अतवृष्टी व गारपीटीमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले होते. अनेकांना रस्त्यावर यावे लागले, अशा पीडित व्यक्तींना शासकीय मदत मिळावी यासाठी आ. संजय पुराम यांनी मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तालुक्यातील १ हजार ६७५ कुटुंबीयांना ४0 लक्ष ८0 हजार रुपयांचा निधी वाटप करण्यात आला. तालुक्यात २0१६ मध्ये झालेल्या अतवृष्टी व गारपीटीमुळे शेतपिकाच्या नुकसानासह नागरिकांच्या घरांची मोठय़ा प्रमाणात पडझड झाली होती. तब्बल १ हजार ६७५ कुटुंबाना याचा फटका बसला असून डोक्यावरील छप्पर गेल्याने त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. या बाबींची गांभीयार्ने दखल घेऊन आ. संजय पुराम यांनी तहसीलदार साहेबराव राठोड यांच्याकडून घरांच्या नुकसानाचे सर्व्हेक्षण करून शासनाला अहवाल सादर केला होता. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आ. पुराम यांच्या प्रयत्नाला यश आले असून या पीडितांना नुकसान भरपाई म्हणून ४0 लाख ८0 हजार रूपयांचा निधी उपलब्ध झाला. दरम्यान, प्रशासनाने पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत खातेनिहाय वळते करून निधीचे वितरण केले आहे. त्यामुळे पीडितांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे

शेतकरी व नागरिकांना पर्यावरणाच्या बदलामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ंअतवृष्टीमुळे शेतपिकांच्या नुकसानासोबत जंगम मालमत्तेचे देखील नुकसान होते. त्यामुळे शेतकरी नागरिक आर्थिकदृष्ट्या हतबल होतो. संकटाच्या समयी शासन नेहमीच शेतकरी, नागरिकांना मदतीचा हात देत आली आहे. तांत्रिक कारणामुळे मदत मिळण्यास विलंब होतो. परंतु शासन नेहमीच नागरिकांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही आ. संजय पुराम यांनी मदत वितरण संदर्भात दिली.