कार्य.अभियंता शेगावकरांनी राजशिष्टाचाराला दाखविला ठेंगा

0
7

गोंदिया,दि.13ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के.शेगावकर यांनी शासकीय कार्यक्रमासाठी निर्धारित करण्यात आलेल्या राजशिष्टाचारालाच ठेंगा दाखविल्याचा प्रकार समोर आला आहे.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गंत नळपाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम 12 एप्रिलला अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात पार पडला.या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका तयार करतांना सबंधित मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना ते येवो की न येवो त्यांचे नाव राजशिष्टाचाराचे पालन करण्याकरीता टाकणे अनिवार्य असते.परंतु शेगावकर यांनी या पत्रिकेत राज्यसभा खासदार प्रफुल पटेल, विधानपरिषदेचे आमदार डाॅ.परिणय फुके,अनिल सोले यांचे नाव प्रकाशित न करताच पत्रिका काढल्याने या तीन लोकप्रतिनिधींना डावलण्यामागची शेगावकरांची भूमिका काय अशा प्रश्न या भूमिपूजन सोहळ्याचा पत्रिकेवरुन उपस्थित झाला आहे.