राष्ट्रीय महामार्गावर कोंढाळीनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार

0
10

नागपूर,दि.13 -अमरावती राष्ट्रीय  महामार्ग क्रमांक सहा वरील कोंढाळी पासून ९ कि. मी . अंतवरील जुनापाणी गावापसून पाचशे मिटर अंतरावर बिबट वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. ही माहिती महामार्ग सुरक्षा पोलीसांनी कोंढाळी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना पहाटे ५.३५ वाजताच्या दरम्यान दिली.
घटनेची माहिती मिळताच कोंढाळीचे वन परिक्षेत्र अधिकारी एफ. आर. आजमी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी मृत बिबट्याचा घटनास्थळ पंचनामा केला. नंतर उपवन संरक्षक मल्लिकार्जून, ऐ .सी .एफ. एस. एन. क्षिरसागर आणि रेंजर एफ आर आझमी यांच्या समक्ष पशूवैद्यकीय अधिकारी अनील ठाकरे , अरूण हांडा आणि चेतन यांनी शवविच्छेदन केले.मृत बिबट अंदाजे दीड ते दोन वर्षाचा असल्याचे सांगण्यात आले.