मुख्य बातम्या:
लमाणतांडा येथे जय सेवालाल महाराज जयंती साजरी# #पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी# #24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार# #तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड# #पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी# #वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार# #रानडुकराची शिकार; तिघांना अटक# #वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी# #डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद# #आम्ही सिंचनाच्या सोयी देऊ ; तुम्ही जोडधंद्यासाठी तयार व्हा : ना. हंसराज अहिर

भंडारा-गोंदिया काँग्रेसला देत पुणे मतदारसंघ राष्ट्रवादी घेणार?

गोंदिया/पुणे(विशेष प्रतिनिधी),दि.13ः- एकीकडे भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल हे 2014 च्या निवडणुकीतील पराभवानंतरही आपल्या मतदारसंघाच्या संपर्कात कायम आहेत.त्यांनी कधीही आपण निवडणुक लढणार नसल्याचे म्हटले नाही.त्यातच नाना पटोलेंनी राजीनामा दिल्याने येत्या काही दिवसात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अशा परिस्थीतीत राष्ट्रवादीचे राज्यातील नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करुन निवडणुक लढण्याचा विचार करीत असल्याची केलेली पत्रपरिषदेतील घोषणा राजकीय दृष्टा महत्वाची ठरली आहे.पुण्यातील राजकीय चर्चेनुसार  पुण्याची लोकसभा आपल्या ताब्यात घेऊन भंडारा-गोंदिया ही राष्ट्रवादीची जागा काँग्रेसच्या नाना पटोलेंना सोडण्याचा विचार पक्ष करत आहे. येत्या काही दिवसातच  पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणुक काँग्रेस लढविण्याच्या पुर्ण तयारीत आहे.त्यातच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल हे राज्यसभेवर निवडून गेले आहेत. त्यांची मुदत जून 2020 पर्यंत आहे.त्यामुळे ते लोकसभा लढणार नाही अशा राष्ट्रवादीच्या वरिष्ठांचा अंदाज आहे.त्यातच नाना पटोलेंसमोर पटेल यांचा निभाव लागेल की नाही यावर पक्षाला विश्वास नसल्याची चर्चा अजित पवारांच्या गटात असल्यानेच या मतदारसघांची ही अदलाबदल करावी असे अजित पवारांना वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे.तसेही प्रफुल पटेलांशी अजित पवारांचे तेवढे चांगले संबध नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

असे असले तरी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक लढविण्याची तयारी दोन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादीने सुरु केली आहे.त्यासाठी भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे,माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर,माजी आमदार मधुकर कुकडे किंवा धनंजय दलाल यांपैकी कुणा एकाला पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आपला उमेदवार म्हणून रिंगणात उतरवू शकते अशी चर्चा आहे.

Share