मुख्य बातम्या:
रेल्वेच्या धडकेत बिबट्याचे बछडे ठार# #चिचगड-देवरी राज्यमार्ग देतोय मृत्यूला आमंत्रण# #देवरी शहरात कीर्तनाद्वारे स्वच्छतेबाबत जनजागृती# #राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दिल्ली येथे २६ नोव्हेंबरला धरणे आंदोलन# #10 दिनों में किसानों के कर्ज करेंगे माफ-राहुल गांधी# #बगैर अनुमति के चुनाव प्रचार कर रहे वाहन को जांच टीम ने पकड़ा# #गोंगपा की महिला मोर्चा की राष्ट्रीय अध्यक्ष हीरासन उइके ने पार्टी से दिया इस्तीफा# #महिला अत्याचाराचा तपास एलसीबीकडे सोपवा-मेश्राम# #संगणीकरण धान्य वितरण प्रणालीत गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल-अनिल सवई# #अंध व अपंगाचे तिसरे दोन दिवसीय राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य व कला संमेलन 17 नोव्हें.पासून

भाजपा नव्हे,तर भारत जलाव पार्टी-शेहला रशिद

गोंदिया,दि.1३~ आसिफावर अत्याचार झाला़ तिला मंदिरात ठेवण्यात आले़ भाजपा आणि याच परिवारातील एका ‘मंच’चा यात सहभाग असून खरे तर हीच भाजपाची संस्कृती आहे़. हे लोक हिंदू एकतेच्या गोष्टी करतात़ अन् बलात्काऱ्यांना वाचविण्यासाठी तिरंगा यात्राही काढतात़. देशात महिलांवर अत्याचार होत असताना भाजपाची ‘बलात्कारी बचाव’ मोहीम सुरू आहे़. सामाजिक न्यायाची कुचंबणा होत असताना राष्ट्रवादी म्हणवणारे बोलत नाही़ तर, जे लोक या अन्यायाविरोधात बोलतात त्यांना राष्ट्रविरोधी ठरविले जाते.काश्मिरात हिंदू एकतेचे नावाने भाजपची जी शाखा काम करीत आहे,तीचे काम बघून भाजपा नव्हे तर भारत जलाव पार्टी असल्याची घणाघाती टिका जवाहरलाल नेहरू विद्यापीठी दिल्लीच्या विद्यार्थी नेत्या शेहला रशीद यांनी व्यक्त केली़.

त्या गोंदियात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समारोहात आज (दि.13) प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष धीरज मेश्राम होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जेएनयुचे माजी अध्यक्ष मोहित पांडे, मिलिंद गणविर,यवतमाळचे रमेश जीवने,देवा रुसे,सुनिल आवळे व अन्य उपस्थित होते.प्रास्तविक विलास वासनिक यांनी केले.तत्पुर्वी चौकातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.त्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. पुढे बोलतांना रशिद म्हणाल्या की, हिंदू एकता नावाने असलेली शाखा बलात्कारी व्यक्तींच्या बचावासाठी करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हिंदू एकता आणू पाहत आहे़, पण त्यांच्या हिंदू एकतेत दलित, मुस्लीम, महिलांना स्थान नाही़.हिंदू एकतेमध्ये कुणी दलीत,मुस्लीम गरीब नसायला हवे परंतु तसे नसून द्वेषपुर्ण वातावरण निर्माण करण्याचे काम हिंदू एकतेच्या नावाखाली सुरु आहे.एका ८ वर्षाच्या मुस्लीम मुलीवर बलात्कार करणार्यांचा बचाव करण्यासाठी पुढे येणारे कोण आहेत.यावरुनच देशात अराजकता कोण माजवित असून देशाचे तुकडे कोण करीत आहे हे दिसून येत असल्याची टिकाही केली.
शेहला रशिद म्हणाल्या, डॉ.आंबेडकरांच्या मुर्तीवर माळा चढवा,मात्र, त्यांचे विचार आत्मसात करून त्यांच्या विचारांना वाढविण्याचे काम आधी करा. हिंदू ,दलित,मुस्लिम असो कुणावरही अन्याय करू नका. देशातील तुरुंग हे दलीत,मुस्लीम,बहुजन,ओबीसीनी भरलेली का आहेत ? हा समाजाच गुन्हेगार आहे का? याचा विचार व्हायला हवा.भाजप म्हणजे बलात्कार बचाव पार्टी झाली असून त्रिपल तलाकच्या नावावर राजकारण करणारे प्रधानसेवक नरेंद्र मोदींनी संसदेत मुस्लीम महिलांना १५ टक्के आरक्षण देऊन दाखवावे,जेणेकरून त्यांच्यावरील अत्याचार कमी होईल. मुस्लीम दलित एकता सामाजिक न्यायासाठी हवी. मात्र, आरक्षणावर आमच्यात मतभेद निर्माण करीत आहेत.आम्हाला रोटीच्या तुकड्यासाठी नव्हे तर पुर्ण रोटीसाठी लढायचे आहे. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच अल्पसंख्याक,ओबीसी दलीत बहुजनाच्या हक्कासाठी आपण सर्वांना एकत्रित येऊन२०१९ मध्ये दंगे लुटमार करून नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ सत्तेवर येण्याचा प्रयत्न करणार अाहेत.त्यासाठी आम्हाला सामाजिक वैचारिक क्रांती करून बहुजनांना न्याय मिळवून  देण्यासाठी काम करावे लागेल असे विचार व्यक्त केले.देशात दलित, मुस्लीम, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत़ आसिफाचे प्रकरण ताजे आहे़ उठताबसता राष्ट्रवादाच्या गप्पा मारणारे भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवारातील संघटनांचे लोक या विषयावर गप्प आहेत. त्यांचा राष्ट्रवाद फसवा आहे, असा घणाघाती आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथील विद्यार्थी नेत्या शेहला रशीद यांनी केला़.या कार्यक्रमाला शहरातील मोठ्या संख्येने मुस्लीम समाजाती महिला पुरुषांनी हजेरी लावली होती.यावेळी मुस्लीम मायनारीटी समाजाच्यावतीने शेहला रशीद यांना स्मृतीचिन्ह देण्यात आला.
Share