भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाभरात अभिवादन

0
15

गोंदिया,दि.14ः- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाभरात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले आहेत. राज्यभरात सुरु असलेल्या सामाजिक समता सप्ताहाचा आज समारोप झाला.येथील तहसिलकार्यालयासमोरील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी होती.तर शहरातील विविध भागातून मिरवणूका काढून जल्लोषात जयंती साजरी करण्यात आली. गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे उपाध्यक्ष कैलास भेलावे,महासचिव शिशिर कटरे,मार्गदर्शक व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे,नुतन बांगरे,एस.आर.निनावे,प्यारेलाल तुरकर,तिर्थराज उके,दुरूगकर आदी उपस्थित होते.

गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने रस व पाणी वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला समितीचे सचिव एल.यु.खोब्रागडे,मनोज दिक्षित,अरुण दिप,किशोर डोंगरवार,मनोहर आसवानी,पुष्पा बोरकर,हेमकृष्ण टेंभुर्णे,पी.बी.सर्याम,संतोष खोटेले,एस.एस.गौतम,मनुताई उके,डी.बी.चेलानी,आर.के.मेश्राम,डी.एफ.बोहने आजी उपस्थित होते.तिरोडा येथे तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांच्या कार्यालयात डाॅ.बाबासाहेब आबंडेकर यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी आमदार विजय रहागडांले,नगराध्यक्ष श्रीमती देशपांडे,बाजार समितीचे सभापती चिंतामण रहागंडाले,उपसभापती ढिंकवार,संचालक पिंटू रहागंडाले,भाजप तालुकाध्यक्ष भाऊराल कठाणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.

गोरेगाव- येथील मॉडेल कॉन्व्हेंट गोरेगाव मध्ये शाळेचे संस्थापक प्रा.आर.डी.कटरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याध्यापिका छाया पी. मेश्राम यांच्या प्रमुख उपस्तिथीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करण्यात आले.जयंती निमित्त आर.डी.कटरे यांनी बाबासाहेबयांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या जीवनातील कर्तृत्वाची जाणीव विद्यार्थाना करून दिली . आपल्या जीवनात बाबासाहेबांचे आदर्श आपल्या समोर ठेऊन आपले जीवन जगावे असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे संचालन पी सी बघेल यांनी केले.

गोरेगाव-तालुक्यातील परशुराम विद्यालय मोहगाव बु. येथे भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७वी जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे हे होते.सर्वप्रथम डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करुन पूजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.जेष्ठ शिक्षक डी.डी.चौरागडे व बी.सी.गजभिये यांनी आपले विचार व्यक्त केले.मुख्याध्यापक बी.डब्लु.कटरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची माहिती देत विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे विचार अंगीकारण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे व्ही.एस.मेश्राम यांनी केले.तर आभार प्रदर्शन पी.एम.चुटे यांनी मानले.कार्यक्रमाप्रसंगी टी.एफ.इडपाचे,कु.भारती बिसेन,पी.व्ही.पारधी,के.बी.पारधी,डी.एम.बोपचे तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.प्रसाद वितरण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

गोरेगाव तालुक्यातील सटवा ग्रामपंचायत येथे आज 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच विनोद पारधी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्र ला माल्यार्पण करून पूजा करण्यात आली. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष इंद्रराज ठाकूर, पोलीस पाटील टिकाराम रहांगडाले, माजी सरपंच रमेश ठाकूर, ग्राम पंचायत सदस्य ओमेंद्र ठाकूर, उमराव कडूकार आदी उपस्थित होते.