मुख्य बातम्या:
खजरी/डोंगरगांव येथील आदिवासी विकास विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात# #मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी द्यावी-ऊर्जामंत्री# #एक शाम राष्ट्र के नाम' कवि संमेलन आज - भाजयुमोचे आयोजन# #तिरंग्या”नं दिला स्वयंरोजगार ! बांबूपासून बनवलेला तिरंगा देश-विदेशात# #अर्जुनी मोर व साकोली पं.स.च्या नव्या इमारत बांधकामाला मंजुरी# #सिरोंचा येथील युवकांची राष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता निवड# #संघी टाॅपर्स अवॉर्ड समारोह ४ फेब्रुवारीला# #समाजाच्या प्रगतीसाठी संघठीत होणे गरजेचे : खनिज मंत्री जायसवाल# #स्वच्छ शौचालय स्पर्धेत सहभागी होऊन पुरस्कार मिळावा# #आर्थिक लाभासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी,शासनाची दिशाभूल-राकेश ठाकुर

सीरियामध्ये अमेरिकेचे हल्ले; नव्या शीतयुद्धाची सुरवात?

वॉशिंग्टन ,दि.14(वृत्तसंस्था): सीरियाचे वादग्रस्त अध्यक्ष बशर अल असाद यांच्या सैन्याकडे असलेल्या रासायनिक शस्त्रांना लक्ष्य करत अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने आज (शनिवार) हवाई हल्ले केले. सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये स्फोट झाल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बशर अल असाद यांच्या राजवटीला लक्ष्य करण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचा सामरिक तज्ज्ञांचा अंदाज आहे. यातून पुन्हा एकदा शीतयुद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री व्हाईट हाऊसमधून राष्ट्राला उद्देशून भाषण केले. ‘सीरियाचे हुकूमशाह बशर अल असाद यांच्याकडे असलेल्या रासायनिक शस्त्रांना लक्ष्य करत हल्ले करण्याचे आदेश मी काही वेळापूर्वी अमेरिकेच्या लष्कराला दिले आहेत’, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. एका अमेरिकी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा वापर करत सीरियातील विविध ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत.

रम्यान, अमेरिकी लष्कराच्या सज्जतेनंतर ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनीही त्यांच्या लष्कराला हल्ल्याचे आदेश दिले. ‘सीरियामधील गृहयुद्धात हस्तक्षेप करण्यासाठी किंवा तेथील राजवट उलथवून टाकण्यासाठी हे हल्ले नाहीत’, असेही मे यांनी सांगितले. ‘संहारक रासायनिक शस्त्रे निर्माण करण्याची सीरियाची क्षमता संपविण्यासाठी फ्रान्सने या हल्ल्यांमध्ये अमेरिका आणि ब्रिटनची साथ दिली आहे’, असे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जाहीर केले. ‘येथील एक वैद्यकीय प्रयोगशाळा आणि लष्करी तळावर अमेरिका आणि त्यांच्या मित्रदेशांनी हल्ले केले आहेत’, असे सीरियातील मानवी हक्क आयोगाच्या निरीक्षकांनी सांगितले.

सीरियाचे उत्तर..! 
सीरियाच्या लष्कराने जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे सोडत अमेरिका आणि मित्र देशांच्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेचा हल्ला जवळपास एक तासभर चालू होता.हा हल्ला संपल्यानंतर असंख्य नागरिक दमास्कसच्या रस्त्यांवर जमा झाले. सीरिया, रशिया आणि इराणचे झेंडे फडकावित त्यांनी निदर्शने केली. सीरियातील सरकारी वाहिनीने ही निदर्शने थेट प्रसारित केली.

Share