मुख्य बातम्या:
लमाणतांडा येथे जय सेवालाल महाराज जयंती साजरी# #पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी# #24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार# #तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड# #पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी# #वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार# #रानडुकराची शिकार; तिघांना अटक# #वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी# #डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद# #आम्ही सिंचनाच्या सोयी देऊ ; तुम्ही जोडधंद्यासाठी तयार व्हा : ना. हंसराज अहिर

न.प.कार्यालयासह विविध ठिकाणी बाबासाहेबांची जयंती उत्साहात

गोंदिया,दि.14ः- भारतरत्न प.पू डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जंयती गोंदिया नगरपरिषदेच्या कार्यालयात साजरी करण्यात आली.नगर परीषद अध्यक्ष अशोक इगंळे व मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पूष्पहार पुजाअर्चना केली.यावेळी प्रशासकिय अधिकारी राणे,दिपक कदम सह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.तसेच नगरसेवक व सभापती सुध्दा उपस्थित होते.

देवरी-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त देवरी येथे दिनबंधु ग्रामीण विकास संस्था देवरी द्वारा ‘ सलग ५ तास वाचन करून अभिवादन ‘ या कृतिशील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमात अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी सहभागी विध्यार्थ्यांनी सलग ५ तास वाचन करून बाबासाहेबांना एक अनोखी आगळी वेगळी आदरांजली दिली.उपक्रमात सहभागी विद्यार्थ्याना राज्यशासनाच्या माहिती व जनसंपर्क ल विभागा मार्फत प्रकाशित होणारे “लोकराज्य ” हा एप्रिल २०१८ चा मासिक अंक ज्या मध्ये डॉ.बाबासाहेब या महामानवाचे जीवनचरित्राचे दर्शन दाखवून अभिवादन करण्यात आले आहे.तो अंक स्मरण भेट म्हणून देण्यात आले.

देवरी-महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका देवरी जिल्हा गोंदियातर्फे महामानव,विश्वरत्न, संविधान निर्माते,सामाजिक समतेचे अग्रदूत,कामगार नेते,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीच्या निमित्ताने देवरी शहरातून निघालेल्या भीम रॅलीतील सहभागी समाजबांधवाना टरबूज वाटप करण्यात आले.बोंडगाव देवी येथील मिलींद बुध्द विहारात आयोजित डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 127 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाला सरपंच राधेश्याम झोळे,डाॅ. शामकांत नेवारे,जि.प.सदस्य कमलताई पाऊलझगडे तथा मान्यवर मंडळी उपस्थित होते.

आमगाव-येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकरचौकात महामानव डॉ.बाबासाहेब आबेंडकर यांच्या पुतळ्याला आमगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माल्यार्पण करण्यात आले.यावेळी नरेशभाऊ माहेश्वरी(माजी म्हाडा सभापती),विजयभाऊ शिवणकर(माजी अध्यक्ष जि.प गोंदिया),सुकरामभाऊ फुंडे (जि.प.सदस्य),जियालालजी पंधरे(जि.प.सदस्य),कमलभाऊ बहेकार(ता.अध्यक्ष NCP),कविताताई रहांगडाले(महिलाअध्यक्ष NCP),देवेन्द्रनाथ मच्छिरके,सौ.शेन्डेताई,विनोद कन्नमवार संचालक कृ.उ.बा.समिती,व आमगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share