तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्षाचे उदघाटन

0
9

तिरोडा,दि.14ः- येथील उपजिल्हा रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्षाचे उदघाटन भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज  आमदार विजयभाऊ रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमाला माजी आमदार भजनदास वैद्य गुरुजी,हरिष मोरे,न.प.तिरोडाचे उपाध्यक्ष सुनीलभाऊ पालांदूरकर, माजी उपसभापती डाँ.वसंतजी भगत,प. स.सदस्य पवन पटले,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाँ. हिम्मत मेश्राम उपस्थित होते.आमदार रहागंडाले यांच्या हस्ते यावेळी रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना फळवितरण करण्यात आले.आ.रहागंडाले यांनी उदघाटनप्रसंगी विचार व्यक्त करतांना रुग्णालयाच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा देण्याचे आवाहन करीत शासन वैद्यकीय सेवेसाठी निधी कमी पडू देणार नाही असेही सांगितले.