राजुरा नगर परिषदेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

0
9

राजुरा,दि.14 :- भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जंयतीनिमित्ताने आज १४ एप्रिल रोजी सकाळी नगर परिषद राजुराच्यावतीने न. प. कार्यालयात नगराध्यक्ष अरूण धोटे यांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर सकाळी ११ च्या सुमारास शहरातील पंचायत समिती चौक येथे स्थित डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि भिम वंदनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. या प्रसंगी भिम वंदना आणि जयघोषांनी संपूर्ण परिसर निनादून गेला.
या प्रसंगी आमदार अँड संजय धोटे, माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अँड वामनराव चटप, राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरूण धोटे,पोलिस उपविभागिय अधिकारी शेखर देशमुख ,ठाणेदार कोकाटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे, पंचायत समिती सभापती सौ. कुंदा जेनेकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ पथाडे, स्वामी येरोजवार, नगरसेवक हरजित सिंह संधू , गजानन भटारकर, आनंद दासरी, राजु डोहे, व्यापारी अध्यक्ष राधेश्याम अडाणीया, नगरसेविका सौ. दिपा करमरकर, सौ. साधना भाके, सौ. उज्वला जयपुरकर, अनिल ठाकूरवार , विमाशी जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे,आदिवासी नेते बाबुराव मडावी,हरी झाडे,नितीन बांब्रटकर,विठ्ठलराव येवले यासह शहरातील डॉ आंबेडकर प्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते