स्पर्धात्मक विद्यार्थी घडविण्याचे महान कार्य शिक्षकांनी करावे-जि. प.उपाध्यक्ष कंकडालवार

0
10

सिरोंचा(अशोक दुर्गम),दि.14ः-.आजचे युग हे सर्वांसाठीच स्पर्धात्मक व आव्हानात्मक असून खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत आपल्या जिल्हा परिषद शाळेत मोफत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तुल्यबळ स्पर्धा करण्याची त्यांच्यात जिद्द व चिकाटी निर्माण व्हावे आणि प्राथमिक शिक्षणासोबतच महामानव, थोरपुरुष व राष्ट्रसंतांची आचार विचार व त्यांचे महान कार्याची शिकवणी विद्यार्थ्यांना देत सोबतच संगणकीय व तंत्रज्ञानाची माहितीचे धडेसुद्धा देऊन स्पर्धात्मक विद्यार्थी घडविण्याची महान कार्य हे शिक्षकांनी करावे, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व आरोग्य आणि शिक्षण सभापती अजय कंकडालवार यांनी केले.
ते पंचायत समिती सिरोंचा व रेगुंठा केंद्रांअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दर्शेवाडा येथे दर्शेवाडा शाळा स्थापन होऊन पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यनिमित्त दर्शेवाडा येथे आयोजित रौप्य महोत्सव व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती महोत्सव सोहळ्याच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.या सोहळ्याची उदघाटन जि. प.उपाध्यक्ष अजय कांकडालवार यांच्या हस्ते थोर पुरुषांची प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली.
या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ग्रा.प.सरपंच कमला आलाम तर प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच वेंकटेश तोडसाम, वैद्यकीय अधिकारी डॉ.वालदे,तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू पुप्पालवार, माजी पंचायत समिती सदस्य तोडसाम चंद्रु, उपसरपंच संतोष जाकावार, ग्रामसेवक आर.के.राऊत,येनमुळे, ग्रा.प.सदस्या लक्ष्मी दिवाकर बेडकी, श्रीनिवास दुर्गे, दिलीप आलाम, स्वामी जाकावार , मुत्तय्या दुर्गम, सूर्यप्रकाश पेंदाम, वेंकटस्वामी जाकावार, दुर्गय्या कुळमेथे, राजेश्याम तोगरी, श्रीनिवास चिलकामारी, शैलेश पोन्नावार , हनुमंतु दुर्गे, मलेरिया वर्कर हशरत खान, दुर्गाजी कोडापे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दर्शेवाडा येथील गावकरी व शाळा व्यवस्थापन कडून या वेळी जि. प.उपाध्यक्ष अजय कांकडालवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.जयंती उत्सव व शाळेच्या रौप्य महोत्सवाला रेगुंठा परिसरातील सर्व प्रतिष्टीत नागरिक, गावकरी व मुख्याध्यापक , शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.रौप्य महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने पार पाडण्यासाठी व कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक , शिक्षक वृंद व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.