आंभोऱ्याजवळ फुटलेल्या कालव्याची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

0
10

गोंदिया,दि.१५ : गोंदिया शहराला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणातून कालव्याद्वारे डांगुर्ली येथील पाणीपुरवठा योजनेजवळ वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असतांना हा कालवा आंभोऱ्याजवळ फुटल्याने पाण्याचा मोठा अपव्यय झाला. त्यामुळे पुजारीटोला धरणातून पाणी सोडणे तात्काळ बंद करण्यात आले. १४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी आंभोऱ्याजवळ फुटलेल्या कालव्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.छप्परघरे प्रामुख्याने उपस्थित होते. हा फुटलेला कालवा दुरुस्तीचे काम जलसंपदा विभागाच्या जेसीपीद्वारे युध्दपातळीवर करण्यात येत आहे. यापुढे पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. त्यामुळे लवकरच गोंदियावासीयांना पुजारीटोला धरणातून कालव्यावाटे वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी डांगुर्ली येथील पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.