मुख्य बातम्या:

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने खा.पटेल व पटोले एका मंचावर

भंडारा,दि.16 : राजकारणात कुणी कायम मित्र नसतात आणि कायम शत्रूही नसतात. परिवर्तन जगाचा नियम असून परिस्थितीनुरूप बदल होत असतात. एकेकाळचे मित्र काही काळासाठी विरोधक बनले आणि आज पुन्हा एक झाल्याचे चित्र भंडाऱ्यात पहावयास मिळाले. अनेक वर्षांपासून एका मंचावर आपल्या नेत्यांना बघितल्याचा आनंद कार्यकर्त्यांना झाला होता.
निमित्त होते, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार नाना पटोले हे एका मंचावर एकत्र आले होते.भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकातील महामानवाच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी स्मारक समितीच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन केले. एका मंचावर हे दोन्ही नेते एकमेकांजवळ बसून विविध विषयांवर चर्चा करीत होते. हे दोन्ही नेते नागरिकांना एकत्र दिसल्यामुळे येणाºया निवडणुकांमध्ये आघाडी होण्याचे संकेत मिळाल्याची चर्चा या कार्यक्रमाचा शेवट होईपर्यंत उपस्थितांमध्ये होती.

Share