मुख्य बातम्या:
गोंदियातील चार तरुण गांगुलपारा जलाशयात बुडाले, तिघांचे मृतदेह ताब्यात# #रेल्वे गाडीतून दारूची तस्करी करणारे गडचिरोलीचे तीन युवक ताब्यात# #संविधानाच्या प्रती जाळण्यामागे भाजपाचे प्लॉनिंग;पत्रपरिषदेत जयंत पाटील यांचा आरोप# #कार्यकर्त्यांनी बुथ कमेटी निर्मितीवर भर द्यावे - जयंत पाटील# #अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे व जमिनीचे स्वतंत्र सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्या# #गांगुलपारा झरने के पास गोंदिया के तीन युवकों का मिला शव, एक की तलाश जारी # #तायक्वांडो स्पर्धेत देवरीच्या योजनला स्वर्णपदक# #ओबीसींच्या समस्या निकाली काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करा# #पालकमंत्र्यांच्या हस्ते शिक्षक वैद्य यांचा सत्कार# #तालुक्यातील ४ ठिकाणी नळयोजनेचे भूमिपूजन

महाराष्ट्रातून तेलंगणात रेती तस्करी 24 ट्रक्टर जप्त

यवतमाळ,दि.16ः-धानोरा (लिंगती) येथील रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात तेलंगणात रेती तस्करीहोत असून महसूल विभाग व पोलीस विभागाने कारवाई करून या घाटावरून रविवारी सकाळी २४ ट्रॅक्टर जप्त केले.धानोरा (लिंगती) हे गाव महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर आहे. या घाटावरून तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यात रेतीची तस्करी करण्यात येत आहे. त्याकडे मात्र कोणाचेही लक्ष नसल्याने कधी ट्रॅक्टर पकडल्यास चिरीमिरी देऊन मोकळे होणाऱ्या तेलंगणातील रेतीतस्करांची मुजोरी वाढतच जात होती. तेलंगणातील रेती घाटावरून नदी पार करून महाराष्ट्रातील चांगल्याप्रकारची रेती तस्करी करू लागले. कारण त्यांना आदिलाबाद येथे चांगला भाव मिळत होता. याबाबत गावकºयांनी त्यांना वारंवार समज दिली. परंतु त्यांची मुजोरी दिवसागणिक वाढतच होती. त्यांनी कोणाचेही न ऐकता रेती तस्करी सुरूच ठेवली. मागील अनेक दिवसांपासून जवळपास ४० ते ५० ट्रॅक्टरने रेतीची तस्करी सुरू होती. त्याचा कोणताही कर महसूल विभागाला मिळत नव्हता. वारंवार सूचना देऊनही ऐकण्याच्या मनस्थितीत महसूल विभाग नव्हता. अखेर गावकºयांनीच सरपंचाची मदत घेऊन महसूल विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने सकाळी ९ वाजता कारवाईला सुरूवात केली. या कारवाईमध्ये महाराष्ट्रातून रेती तस्करी करण्यासाठी आलेले २४ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. हे ट्रॅक्टर पुढील कारवाईसाठी पाटण पोलीस ठाण्यात नेण्यात आले. जप्त करण्यात आलेले सर्वच ट्रॅक्टर हे तेलंगणा राज्यातील असून सोबतच रेती गोळा करण्यासाठी आणलेले साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले. ही झरी तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई असून या कारवाईकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार शिवाजी लष्करे व त्यांचे सहकारी करीत आहे. घटनास्थळी मंडळ अधिकारी देशपांडे, तलाठी बाळकृष्ण येरमे, संदीप शेळके, गणेश गुशिंगे उपस्थित होते.

Share