मुख्य बातम्या:
राष्ट्रवादी काँग्रेसने खड्यात बेशमरची झाडे लावून केले आंदोलन# #आ.अग्रवालांनी कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयाचे केले कौतुक# #कन्हैयाकुमार, प्रकाश राज रविवारी नागपुरात# #शुक्रवारपासून गडचिरोलीत कृषी व गोंडवन महोत्सव# #अकोल्यात जीर्ण इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू# #अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गुरुवारला# #नक्षल्यांनी पेरून ठेवलेले विस्फोटक पोलिसांनी केले जप्त# #"प्रविण कोचे उत्कृष्ठ पोलीस पाटील पुरस्काराने सम्मानीत"# #अवैध रेतीवाहतूकीवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक# #परिवर्तन स्पेशल स्कूल (पीओ आरडीएसी)  सफदरजंग एन्क्लेव में बच्चों की स्पर्धा

बुलडाण्यात शिवशाही बस उलटली; दहा प्रवासी गंभीर जखमी

बुलडाणा,दि.16ः- अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार आगाराची शिवशाही बस उलटल्याने १0 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.रविवारला संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान चिखली तालुक्यातील उंद्री या गावाजवळ बसला अपघात झाला. अपघातातील जखमींवर उंद्री येथील प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. चांदूरबाजार आगाराची शिवशाही बस (क्र. एम. एच. 0९ – ई.एम. २५७८) औरंगाबादकडे जात होती. दरम्यान, उंद्रीनजीक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस उलटली. बसमध्ये एकूण २३ प्रवासी होते. त्यापैकी १0 प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच उंद्री व वैरागड येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी जखमींना बसमधून बाहेर काढले. उंद्री येथे प्राथमिक उपचारानंतर, सर्व जखमींना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं. जखमींमध्ये चालक दीपक विश्वनाथ इंगळे (वय ४२), वाहक चंद्रशेखर अर्जुनराव नागदिवे (वय २९), संजय शंकर पोटे (वय ५0), तन्वी संजय पोटे (वय १५), अनुज संजय पोटे (वय १0) तिघेही रा. औरंगाबाद, भगवान प्रेमचंद पटेल (वय ५२),तेजल भगवान पटेल (वय १७) दोघेही रा. हतोडी ता. अंजनगाव,सुषमा संजय पोटे (वय ४५) रा. औरंगाबाद, सै.शहाबुद्दीन सै. हबीबद्दीन (वय ४५) रा. औरंगाबाद, सै.आयशा सै.शहाबुद्दीन (वय ४0) रा. औरंगाबाद यांचा समावेश आहे.

Share