मुख्य बातम्या:
रेल्वेच्या धडकेत बिबट्याचे बछडे ठार# #चिचगड-देवरी राज्यमार्ग देतोय मृत्यूला आमंत्रण# #देवरी शहरात कीर्तनाद्वारे स्वच्छतेबाबत जनजागृती# #राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दिल्ली येथे २६ नोव्हेंबरला धरणे आंदोलन# #10 दिनों में किसानों के कर्ज करेंगे माफ-राहुल गांधी# #बगैर अनुमति के चुनाव प्रचार कर रहे वाहन को जांच टीम ने पकड़ा# #गोंगपा की महिला मोर्चा की राष्ट्रीय अध्यक्ष हीरासन उइके ने पार्टी से दिया इस्तीफा# #महिला अत्याचाराचा तपास एलसीबीकडे सोपवा-मेश्राम# #संगणीकरण धान्य वितरण प्रणालीत गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल-अनिल सवई# #अंध व अपंगाचे तिसरे दोन दिवसीय राज्यस्तरीय समाजोत्थान साहित्य व कला संमेलन 17 नोव्हें.पासून

लाखनी येथे कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळा बुधवारला

लाखनी,,दि.16: सामूहिक विवाह हे खऱ्या अर्थाने चळवळ म्हणून उदयास आले पाहिजेत. वर वधु यांच्या कुटुंबीयांना आर्थिक चणचण होऊ नये, कष्ट कमी व्हावे आणि विवाह सोपस्कार तसेच इतर सर्व गोष्टी सोईस्कर व्हाव्यात यासाठी कुणबी समाज मंडळ लाखनीच्या वतीने गेली २४ वर्ष अतिशय उत्तम रित्या विवाह सोहळ्याचs आयोजन केले आहे. यंदा हे रौप्य महोत्सवी वर्ष असून अक्षय तृतीयेच्या शुभ पर्वावर २३ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. श्री संत तुकाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लाखनी व कुणबी समाज सेवा मंडळ लाखनीच्या वतीने दि. १८ एप्रिल २०१८ रोज बुधवारला अक्षय तृतीयाच्या शुभपर्वावर “सामूहिक विवाह सोहळा” स्थानिक समर्थ मैदानात आयोजित करण्यात आला आहे.  कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल पटेल, राज्याचे उर्जामंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी शिक्षण राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुद्धे, माजी खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशिवार, माजी आमदार सेवक वाघाये, मधुकर कुकडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे,दादा टिचकुले, जि.प.अध्यक्ष राजेश डोंगरे, माजी अध्यक्षा  भाग्यश्री गिल्लोरकर, जि.प. भंडाराचे माजी सभापती विनायक बूरडे, जि.प.सदस्य आकाश कोरे,नीलकंठ कायते, माजी सभापती अशोक चोले, बावणे कुणबी समाज भंडाराचे अध्यक्ष सदानंद इलमे आदी मान्यवर या सोहळ्याला तसेच वधुवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. परिसरातील सर्व मान्यवर, समाजबांधव, नागरिक यांनी सामूहिक विवाह सोहळ्याला वधुवरास शुभाशीर्वाद देण्यास उपस्थित राहावे असे आवाहन सामूहिक विवाह सोहळा संयोजक राजेश बांते, सहसंयोजक विलास वाघाये, कुणबी समाज मंडळ लाखनीचे अध्यक्ष  जयकृष्ण फेंडरकर, उपाध्यक्ष उमराव आठोडे, सचिव रामदास सार्वे, युवा समिती अध्यक्ष उमेश सिंगनजुडे, महिला समिती अध्यक्ष आशा वनवे यांनी केले आहे.

Share