मुख्य बातम्या:

कर्जमाफी यादीत नाव नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

यवतमाळ,दि.17 : मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या सावळेश्वर (ता. उमरखेड) गावातील माधवराव शंकरराव रावते (७५) या शेतक-याने कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने स्वत:च्या शेतात सरण रचून जाळून घेऊन आत्महत्या केली. शनिवारी घडलेल्या या घटनेला सोमवारी वाचा फुटली.
रावते यांच्याकडे १ हेक्टर, ४६ आर खडकाळ जमीन आहे. कर्जमाफीत नाव नसल्याने ते हताश होते. अशातच शनिवारी दुपारी ते शेतात गेले. स्वत:च सरण रचले. त्याला आग लावून त्यात उडी घेतली. यात त्यांचा मृ्त्यू झाला. बिटरगाव पोलिसांना सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली.

Share