मुख्य बातम्या:
काँग्रेस नेते पटोलेंच्या नेतृत्वात धडकला जनआक्रोश मोर्चा# #लाखाची लाच घेतांना उपअभियंता जाळ्यात# #ओबीसीच्या मुद्द्यावर भाजप लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे पडले-आ.विजय वडेट्टीवार# #वेतन कपात प्रश्नी, सीईओची मुख्य सचिवाकडे तक्रार करणार# #पालकमंत्री संजय राठोड यांचा आज वाशिम जिल्हा दौरा# #स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार राज्यभर आंदोलन# #कुष्ठरुग्ण शोध अभियान यशस्वीतेसाठी जनतेनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे# #युवकावर चाकुने वार केल्या प्रकरणी युवतीवर नागभीड पोलीसांनी केला गुन्हा दाखल# #ओबीसी गैरआदिवासीच्या अन्यायाविरोधात ओबीसी युवा महासंघाने केली निर्णयाची होळी# #आलापल्ली-भामरागड मार्गावर आढळले नक्षली बॅनर

एमआयईटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले रोटाव्हेटर

भंडारा,दि.17 : शेती आज तोट्याची झाली असल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते. मात्र आजही अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा ऐकायला मिळते. मात्र आजही अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग व योगा कृषीविषयक मार्गदर्शन योग्य नियोजन भरवशावर शेतीतून समृद्धीकडे वाटचाल करीत आहेत. याला जोड एमआयईटीच्या विद्यार्थ्यांनी कमी किमतीत कमी आकारमान व वजनाचा यशस्वी रोटाव्हेटर तयार करून शेतीउपयोगी यंत्र विकसीत केले.
गरज ही शोधाची जननी आहे. या म्हणी आहे आणि या गरजेतूनच अनेक वस्तु व यंत्रांचा शोध लागतो. शेतकऱ्यांची गरज ओळखून जवळील शहापूर येथील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी अशा रोटाव्हेटरची निर्मिती केली आहे. आज निसर्गामध्ये बदल पाहावयास मिळत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसतो.
काबाडकष्ट करूनही अनेकदा शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. शेतकरीही काळानुरूप बदलत आहेत. आधुनिक शेतीची कास धरत आहेत. बैलाऐवजी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. मात्र बाजारात कृषी यंत्राची किंमतही साधारण शेतकऱ्यांना परवडणारी नाही. हीच बाब हेरून अक्षय लेदे, अमित गिऱ्हेपुंजे, धिरज तिरपुडे, नरेश दडमल, संदीप वंजारी, सुमित गजभिये यांनी ज्ञानाचा उपयोग करीत सामान्य शेतकऱ्यांना परवडेल असे रोटाव्हेटर व बेडरिमेकर यंत्र तयार केले. या यंत्राचा उपयोग शेत तयार करणे, माती बारीक करणे, पीक लागवडीसाठी सरी तयार करणे पिकातील तण काढणे असे बहुआयामी कामे केली जाते.
बाजारात उपलब्ध असलेल्या यंत्राच्या तुलनेत हे यंत्र शेतकऱ्यांना अगदी माफक दरात उपलब्ध होईल. या यंत्राचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रा. गिरीश भिवगडे, प्रा. अजय मोतीवाल, चाफले, देशकर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेले यंत्र हे बाजारातील यंत्रापेक्षा कमी किंमतीचे आहे. यामुळे पैशांची बचत होऊन वेळेचीही बचत होणार असल्याचे मत प्रगतीशिल शेतकरी वासूदेव गिºहेपुंजे यांनी व्यक्त केले.

Share