कबीर कला मंच, रिपब्लिकन पॅंथरसह वकिलाच्या घरावर छापेमारी

0
10

पुणे/नागपूर,दि.17-पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी पार पडलेल्या एल्गार परिषदेप्रकरणी पुण्यातील कबीर कला मंच, मुंबईतील रिपब्लिकन पॅंथरचे कार्यालय व घरावर तसेच गेल्या वर्षापासून नक्षलवाद्यांच्या केसेस लढणारे नागपूरातील वकिल सुरेंद्र गडलिंग यांच्या घरी पुणे पोलिसांनी छापा सत्र सुरू केले आहे. आज पहाटेपासून पुणे, मुंबई व नागपूरमध्ये एकाच वेळी हे छापे टाकले आहेत. दरम्यान, आजच्या धाडीचा एल्गार परिषदेशी संबंध नाही, शहरी भागात नक्षली चळवळींची पाळेमुळे रूजत आहे, त्याच्या संशयावरून संबंधित कारवाई होत आहे असे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी शनिवार वाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे दलित समाजातील लोकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्यानंतर हिंसाचार उफाळला होता. या घटनेच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्त्वाखाली दलित संघटनांनी 3 जानेवारीला ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला होता.

या घटनेनंतर 7 जानेवारी 2018 रोजी कबीर कला मंचच्या चार जण, तर रिपब्लिकन पँथरच्या चार जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आज पहाटे पासून पुण्यातील कबीर कला मंचच्या दोन कार्यकर्त्यांच्या घरावर तर मुंबईत रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयावर पुणे पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत.कबीर कला मंचच्या वाकडमधील सागर गोरखे या कार्यकर्त्याच्या घरी पोलिसांनी छापा टाकला आहे. तसेच रमेश गायचोर या कबीर कला मंचच्या कार्यकर्त्याच्या घरीही छापेमारी टाकत काही साहित्य जप्त केले आहे. मुंबईतही रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयावर व कार्यकर्ते सुधीर ढवळे आणि हर्षाली पोतदार यांच्या घरी झडतीसत्र घेतले जात आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचारात नक्षलवाद्यांचा हात असल्याचा पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागपूरचे अॅंड. सुरेंद्र गडलिंग यांच्या नागपूरातील घरावर छापेमारी करण्यात येत आहे. गडलिंग हे मागील 20 वर्षापासून नक्षलवाद्यांच्या केसेस लढवताहेत