२० ते २६ एप्रिल दरम्यान ग्राम शिबिराचे आयोजन

0
12

गोंदिया,दि.१७ : २० ते २६ एप्रिल दरम्यान गोंदिया तालुक्यातील महसुली गावात ग्राम शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात राज्यपालांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या/खातेदारांच्या जमिनीसंदर्भात ज्या नोंदी घ्यायला सांगितल्या आहेत त्याची मोहिम घेण्यात येईल. तलाठी त्या गावातील आदिवासी तसेच इतर खातेदारांच्या कोणत्याही नोंदी करावयाच्या प्रलंबीत आहे काय हे विचारुन प्रलंबीत महसुली कामांच्या नोंदी घेवून पुर्तता करतील. ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीच्या सर्व मजुरांना रोजगार हमी योजनेच्या संदर्भातील ९० दिवसापर्यंत काम केल्याचे फायदे काय आहेत हे समजावून सांगतील. वन विभागाचे कर्मचारी गावातील सर्व शेतकऱ्यांच्या बांधावरील १०० से.मी. गोलाईवरच्या झाडांच्या घेरी मोजून घेतील व त्याची नोंद सातबारावर करण्याच्या दृष्टीने नियोजन करतील. तलाठी व वन विभागाचे कर्मचारी मिळून त्या नोंदी सातबारावर घेतील. प्रत्येक गावातील नर्स यांनी गावातील गरोदर स्त्रियांच्या घरातील पुरुषांनी त्यांच्या आरोग्याकडे व पोषक आहाराकडे कसे लक्ष्य दयावयाचे आहे व त्या स्त्रीच्या अन्न पुरवठ्याकडे कसे लक्ष्य दयावे याची माहिती देतील. कृषी सहायक हे गावातील सर्व शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व, पीक विमा योजना, शेताच्या बांधावर फळबाग लागवड याबाबतची माहिती देतील तसेच पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचारी सर्व शेतकऱ्यांना संकरीत गाईबाबत कृत्रिम रेतनाची माहिती देतील. तरी या ग्राम शिबिराला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन तहसिलदार रविंद्र चव्हाण यांनी केले आहे.