राम शिंदेंच्या स्वीय सहायकावर खंडणीचा गुन्हा दाखल

0
10

अहमदनगर,दि.20- जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या स्वीय सहायकासह मनसे शहर जिल्हाध्यक्षावर एका ठेकदाराला वाळूचा ठेका चालवण्याच्या बदल्यात 10 लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कोतवाली पोलिसांनी ही कारवाई गुरुवारी रात्री केली.मिळालेल्या माहितीनुसार पालकमंत्र्याचे स्वीय सहायक बापू बाचकर आणि मनसे शहर जिल्हाध्यक्ष गजानन राशीनकर यांनी ठेकेदार नंदकुमार गागरे (राहणार देसवंडी तालुका राहुरी) यांना 10 लाखांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दोघांनी दिली. नागरे यांनी दिलेल्या फिर्यादित जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी ही खंडणी मागून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे या फिर्यादित म्हटले आहे. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.