उद्घाटन होताच व्यसनमुक्ती साहित्य संमेलन रद्द,ना.बडोलेंची अनुपस्थिती

0
22

बीड,दि. २१ : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटन होताच कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की शासनावर आली आहे़.विशेष म्हणजे ज्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.त्या विभागाचे मंत्री ना.राजकुमार बडोले सुध्दा उदघाटनाला अनुपस्थित राहिल्याने चर्चांना पेव फुटले आहे.हा समेलन पुरस्काराच्या घोषणेपासूनच वादात नेहमी राहिला आहे.पात्र व योग्य व्यक्तींना डावलून इतरांनाच नेहमी व्यसनमुक्तीचे पुरस्कार जाहीर होत आल्याने हे समेंलन भाजप कार्यकर्ते व समर्थकांना खुश करण्यासाठीच असल्याचे ब्रीद ठरले. त्यातच बीड, उस्मानाबाद व लातूर विधानपरिषदेच्या निवडणुका आज जाहीर होताच संमेलन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उत्साहाने जमा झालेल्या कार्यकर्त्यांना आपापल्या गावी परतावे लागले.
शनिवारी (दि. २१ एप्रिल) सकाळी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे महाराष्ट्र शासन आयोजित व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाला सुरूवात झाली. बीड शहरातून भव्य व्यसनमुक्तीची दिंडी काढण्यात आली होती. आमदार विनायक मेटे, संध्या बडोले, वर्षा विलास, अविनाश पाटील आदी दिंडीमध्ये सहभागी झाले होते. दिंडी यशवंतराव चव्हाण सभागृहात आली़ व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटनही आमदार विनायक मेटे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यभरातून एक हजार कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण सभागृहात जमा झाले होते. राज्यभरातून आलेले २१ विविध विषयांवरील स्टॉल लावण्यात आले होते. अचानक आचारसंहितेमुळे कार्यक्रम रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन सुरू करण्याची संधी सात वर्षांपासून महाराष्ट्राला लाभली़ दरवर्षी २ आॅक्टोबरला साहित्य संमेलन सुरू होत होते़ मात्र गेल्या तीन वर्षांपासून उशिरा व्यसनमुक्ती साहित्य संमेलन उशिराने सुरू होत आहे़ यंदा २१ मार्चचे संमेलन विधानसभा अधिवेशनामुळे पुढे ढकलण्यात आले होते. २१ एप्रिल रोजी मुहूर्त काढण्यात आला़ मात्र विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका बसला आहे़ संमेलनावर करण्यात आलेला खर्च वाया गेला आहे.विशेष म्हणजे मुंबई च्या ज्या एका संस्थेला याचे संपुर्ण नियोजन दिले जाते त्या संस्थेचा कामकाज आणि तेथील पदाधिकारी यांचे संबध या विभागातील मंत्री व अधिकायाशी तपासावे अशीही चर्चा सुरु झाली आहे.