पोलिसांसोबत चकमकीत 14 माओवाद्यांना कंठस्नान

0
7

गडचिरोली,दि.22(अशोक दुर्गम)- भामरागड तालुक्यातील ताडगाव परिसरात पोलिस – नक्षल चकमक, चौदा नक्षली ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नक्सलविरोधी अभियानाचे राबवत असतांना हि चकमक झाल्याची माहिती पोलिस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे यांनी दिली आहे. आतापर्यंतच्या गड़चिरोलीच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने नक्सली ठार होण्याची ही पहिली वेळ आहे. मागच्याच महिन्यात सिरकोंडा जंगलात झालेल्या चकमकित 3 नक्सली ठार झाले होते. त्यामुळे लगोपाठ झालेल्या या धक्कमुळे नक्सल चळवाळी ला मोठा हादरा बसला आहे.
भामरागड उपविभागातील ताडगाव – कसनसूर जंगल परिसरात आज २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान पोलिस – नक्षल चकमक उडाली असून या चकमकीत मोठ्या प्रमाणात नक्षली ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आजपर्यंतच्या कार्यकाळातील ही सर्वात मोठी कार्यवाही असण्याची शक्यता असून उच्च पदस्थ नक्षली ठार झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. नक्षलविरोधी शोधमोहिम सुरू असताना ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पोलिस विभागाशी संपर्क साधला असता चकमक झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.