रानडुकराचे मांस विक्री करणार्‍या आरोपीला अटक

0
6

गोंदिया,दि.23ः-अजुर्नी मोरगाव तालुक्यातील अरुणनगर येथे आठवडी बाजारात खुल्या ठिकाणी रानडुकराचा मांस विक्री करताना ६५ वर्षीय आरोपीला (दि.२0) अटक करण्यात आली. या प्रकरणी न्यायालयाने २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
लाखांदूर तालुक्यातील इंदोरा येथील ब्रम्हदास मेर्शाम (६५) हा रानडुकराची शिकार करून अरुणनगर येथील आठवडी बाजारात मांस विक्री करत होता. मिळालेल्या माहितीवरुन वन विभागाच्या अधिकारी, कर्मचार्?यांनी घटनास्थळी धाड घालून आरोपीला मांस विक्री करताना पकडले. तक्रारीवरुन भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता २३ एप्रिलपयर्ंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई क्षेत्र सहायक एम.ओ. राऊत, वनरक्षक पी.एम. केडवतकर, डी.एन. टेंभरे, एन.के. भैसारे, पी.के. ब्राम्हणकर, अनिल खुणे, दिलीप डोंगरवार, शंकर मेश्राम यांनी केली.