मुख्य बातम्या:

आॅटो रिक्षा आणि टेम्पोची धडक, नवदांपत्याच्या जागीच मृत्यू

नांदेड,दि.23-बिलोली तालक्यातील कासराळी गावाजवळ हैद्राबाद नांदेड हायवेवर सोमवारी सकाळी   टेम्पो क्र. एम. एच.२४ एटी ०११९ आणि आॅटो क्र. एम. एच.२६एन.५६३०च्या धडकेत नवदांपत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जखमी झाले असून त्यांना नांदेड येथे उचारासाठी दाखल करण्यात आले आहे.नवदाम्पत्याचे १९ एप्रिल रोजी लग्न झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार शिवलिंग कुलके (24 उदगीर, आणि कोमल यशवंतकर (20, नांदेड) यांचा 19 एप्रिल रोजी विवाह झाला होता. त्यानंतर ते आज देवदर्शनासाठी आपल्या कुटुंबियांसोबत निघाले होते. सकाळी कासराळी गावाजवळ टेम्पो त्यांच्या आॅटो रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात शिवलिंग आणि कोमलचा जागीच मृत्यू झाला तर शिवराज मंटाळकर (30), कृष्णा मंटाळकर (16), सविता बेल्लूरकर (35) हे जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. अपघातग्रस्तांना डॉ. ज्ञानेश्वर बागल,पत्रकार राजेंद्र कांबळे,पायलट प्रकाश सोनकांबळे,संतोष जाधव दगदापुरकर यांनी जखमींना तात्काळ बिलोलीच्या ग्रामीण रुग्णालयात हलवले.

Share