मुख्य बातम्या:
रमाई आवास योजनेअंतर्गत ७३३ घरकुलांना मंजूरी - महापौर सौ.शीलाताई किशोर भवरे# #डोंगरगाव दुष्काळ यादीत समाविष्ट करा : सरपंच वैरागडे# #आज तऱ्हाळा येथे सेंद्रिय शेती प्रशिक्षण व महिला सक्षमीकरण शिबीर# #मंदिर समितीच्या जागेवर जेएमसी कपंनीचे अवैध बांधकाम# #सर्वच स्तरावर केंद्र व राज्य सरकार अपयशी-खा.पटेल# #खासगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे समायोजन करा# #घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा ! – उद्धव ठाकरे# #जादूटोणा हे समाजाला घातकच- डॉ. प्रकाश धोटे# #बुथस्तरावर संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे - खा. पटेल# #भंडारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी यशवंत सोनकुसरे

नक्षलवाद्यांना पुन्हा एक हादरा;दुसऱ्या चकमकीत 6 नक्षलवादी ठार

गडचिरोली,दि.24ः जिल्ह्यात ४८ तासांत झालेल्या दुसऱ्या चकमकीत सोमवारच्या सायकांळी सहा नक्षल्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. मृतकांमध्ये जहाल नक्षली आणि नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य नंदूचा समावेश असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. अहेरी तालुक्यातील राजाराम खांजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पत्तीगावच्या जंगलात सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही चकमक झाली.

पत्तीगावच्या जंगलात कसनसूर-बोरियाच्या चकमकीतून बचावलेले काही माओवादी असल्याची माहिती अतिरीक्त पोलिस अधीक्षक राजा आणि हरी बालाजी यांना मिळाली होती. तातडीने या दोन्ही अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सी-६० कमांडोचे पथक या भागात पोहचले. शोध मोहीम राबवित असतानाच दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनीही प्रत्युत्तर दिल्याने चकमक उडाली. गोळीबार थांबल्यानंतर घटनास्थळाचा शोध घेण्यात आला असता सहा नक्षल्यांचे मृतदेह सापडले. रात्री उशिरा या नक्षल्यांचे मृतदेह अहेरीच्या प्राणहिता मुख्यालयात आणण्यात आले. बोरियाच्या जंगलातील चकमकीनंतर नक्षलवादी बॅकफूटवर गेल्याची चर्चा होत असतानाच पुन्हा सहा ठार झाल्याने चळवळीला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सोमवारी बोरियाच्या जंगलातील चकमकीत ठार झालेल्या १६पैकी १२माओवाद्यांची ओळख पटविण्यात आली. इतर चार माओवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

Share