गोसेखुर्द धरणाचा वाढदिवस व प्रकल्पग्रस्तांचा काळा दिवस साजरा

0
19

भंडारा,दि.24ः-शहापूर पिपरी पुनर्वसन येथे (दि.२२)गोसेखुर्द धरणाचा वाढदिवस व प्रकल्पग्रस्तांचा काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. 22 एप्रिल १९८८ ला विदर्भातील सर्वात मोठे धरन गोसेखुर्द धरण या धरणाचे या दिवशी उदघाटन झाले होते. आणि प्रकल्पग्रत बाधीतांना  प्रकल्पग्रत हे नविन नाव मिळाले. या नावाने किती हाल अपेक्षा झाल्या. हे प्रकल्पग्रत बाधीतांना कळते असे प्रकल्पग्रत लोकांचे म्हणणे आहे.
कित्येक लोक प्रकल्पग्रस्त, भूमिहीन, बेघर, व बेरोजगार झाले  त्यांनाच माहीत आहे हालअपेक्षा म्हणून दि.२२ एप्रिल २०१८ रोजी गोसेखुर्द धरणाला ३० वर्षे पूर्ण झालीत त्याच प्रसंगी गोसेखुर्द धरणाचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्याचं प्रसंगी प्रकल्पग्रस्तांचा शेतकरी संघर्ष समिती व विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने नविन पिपरी येथे सकाळी ९.३० वाजता प्रकल्पग्रस्तांचा काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी गोसेखुर्द धरणाचा वाढदिवस साजरा करते वेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे भंडारा जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष प्रविण भोंदे यांचे हस्ते केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा तालुका अध्यक्ष भाऊ कातोरे, राजेंद्र बावने, माजी पं.स.उपसभापती निशांत मेश्राम, संतोष कातोरे,अनिरुद्ध गजभिये, प्रज्योत घुले, प्रदीप अतकरी, विजय कांबळे,निखिल सावरकर, मुजिब शेख, किशोर लांडगे, हरी पडोळे, दुर्गेश तिजारे, भुषण कातोरे, आकाश वासनिक, योगेश कातोरे मिथुन भोयर, शैलेश कारेमोरे, अनिकेत घुले व अदि कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी राज्य सरकारने प्रकल्प ग्रस्तांना विविध दिलेले आश्वासन सुद्धा फोल ठरल्याने या सरकार विरोधात काळ्या पाट्या डोक्यावर लावून निषेध केला आहे.