पोलिस उपनिरीक्षकासह पाच पोलिस कर्मचारी निलंबित

0
9

चंद्रपूर,दि.25ः-चंद्रपूर जिल्हा महामार्ग पोलिसी अधिकार्‍यासह पाच पोलिस कर्मच्यारी हे निलंबित झाले असुन ही कारवाही ए.डी.जी.पी. (वाहतूक प्रभारी ) मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली संजय शिंत्रे, पोलिस अधीक्षक (महामार्ग पोलिस) चंद्रपुर यांनी २३ एप्रिलला केली.जिल्ह्यात काही दिवसा पासून सोशल मीडियाद्वारे महामार्ग पोलिसी पथकाचा पैसे घेत असल्याचा वीडियो वार्‍यासारखा पसरला होता त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून कारवाईची मागणी सोशल मीडियावर करण्यात आली होती. हाच व्हिडीओ महामार्ग वाहतुकींच्या वरिष्ठापयर्ंत पोहचल्याने मा. ए. डी. जी. पी. पद्मनाभन, वाहतुक प्रभारी मुंबई यांच्या मार्गदर्शना खाली संजय शिंत्रे महामार्ग पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांनी केली.
जिल्हा महामार्ग पोलिस संजय शिंत्रे, पोलीस अधीक्षक (महामार्ग पोलिस) यांनी चंद्रपूर येथील पोलिस उपनिरीक्षक कांचन चव्हाण व पोलिस कर्मचारी प्रणय गायकवाड., सुरेश वेल्हेकर, देवानंद डुकरे, दीपक खरतडे आणि ड्रायव्हर दामोधर करंबे यांना निलबिंत केले आहे.