संगणकचालक धडकले जिल्हा परिषदेवर

0
10
गोंदिया,दि.25-जिल्ह्यातील ग्राम पंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये काम करणार्या संगणक चालकांना मानधन देण्यात आले नाही. तेव्हा संगणक चालकांना त्वरीत मानधन देण्यात यावे व अन्या मागण्यांना मागणीला घेवून संगणक चालकांना बेमुदत कामबंद आंदोलन करून जिल्हा परिषदेवर आज २५ एप्रिल रोजी धडक मोर्चा काढून आपल्या विविध मागण्याचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांना निवेदन दिले.दरम्यान संगणक चालकांच्या आंदोलनाला ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन,सचिव एल.आर.ठाकरे,रामा जमईवार यांनी भेट देऊन समर्थन दिले.मुख्य कार्यकारी अधिकारी दयानिधी आंदोलकांच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.
जिल्ह्यातील ग्राम पंयातीच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये काम करणाNया मोजक्याच संगणक चालकाचे माहे जुले ते माहे ऑक्टोंबर २०१७ पर्यंतचे मानधन देण्यात आले आहे. निम्म्यापेक्षा अधिक संगणक चालकांचे चार महिन्यांचे मानधन आतापर्यंत देण्यात आले नाही. तेसच ऑक्टोंबर २०१७ ते मार्च २०१८ पर्यंतचे जिल्ह्यातील सर्व संगणक चालकाचे मानधन देण्यात आले नाही. ऐवढेच नाही तर अनेक संगणक चालकांना १३ महिन्यांचे मानधन देण्यात आले नाही.मानधनासंदर्भात वारंवार प्रोजेक्ट मॅनेजर यांचेशी चर्चा करूनही यासंदर्भात तोडगा काढण्यात आलेला नाही. उलट तालुक्यातीस समन्वयक फक्त कामासंदर्भात संगणक चालकांना नाहक त्रास देण्याचे काम करीत आहेत. विना मानधन संगणक चालकांनी किती दिवस कामे करायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला असून त्यांचेवर उपासमारीची पाळी आली आहे. दरम्यान, संतापलेल्या संगणकचालकांनी ९ एप्रिलपासून ग्राम पंचायतीच्या सर्व ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला आहे. तर १७ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. तर आज २५ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून आपल्या विविध मागण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिले. या मोच्र्याचे नेतृत्व जितेंद्र साखरे,नितीन कटरे, दिलीप वंजारी,कृष्णा बहेकार यांनी केले. आंदोलननात शेकडो संगणक चालकांनी सहभाग घेतला होता.