कुंभीटोल्यात महिलांनी पकडली ५०० बॉटल देशी दारू

0
25

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.25ः- तालुक्यातील अर्जुनी मोरगाव पोलीस ठाणेतंर्गत येत असलेल्या कुंभीटोला येथे अवैधरित्या देशी दारु विक्री करणार्या इसमाकडून महिला बचत गटाच्या महिलांनी देशी दारूच्या 500 बाॅटल पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचा प्रकार आज  उघडकीस आला आहे.कुंभीटोल्यात अर्जुनी मोरगाव येथून पल्सर दुचाकीवर गोलू शहारे हा १७ वर्षीय युवक गावात आला असता महिलांनी त्याला थाबंविले.आणि दुचाकीवर असलेल्या सिमेंट पोतीची तपासणी केली असता ५०० च्या वर देशी दारूच्या बॉटल आढळून आल्या.लगेच याबाबतची माहिती अर्जुनी मोरगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी गावातील दारूविक्रेता राजू मोहबे आणि गोलू शहारेला ताब्यात घेत  त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला.