युतीच्या प्रस्तावाची वाट न पाहता विधान परिषद स्वबळावर लढण्याचे शिवसेनेचे संकेत

0
11

मुंबई,दि.26(विशेष प्रतिनिधी)- युतीच्या प्रस्तावाची वाट न पाहता विधान परिषद स्वबळावर लढण्याचे शिवसेनेचे संकेत दिले आहेत. नाशिकमधून नरेंद्र दराडेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून कोकणमधून राजीव साबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेने घेतलेल्या निर्णयानंतर आता भाजपच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने आधीच जाहीर केला आहे. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी होणार असल्याने सत्ताधारी भाजप-शिवसेना युती कायम राहिली पाहिजे, अशी भाजपची इच्छा आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी वेळोवेळी शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुका लढवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. भाजपकडून शिवसेनेची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहे.