मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक २८ मे रोजी

गोंदिया,दि.२६- केंद्रिय निवडणुक आयोगाने आज भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसह देशातील ३ लोकसभेच्या पोटनिवडणुका व १० विधानसभा जागाची पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला असून २८ मे रोजी मतदान व ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.३ मे पासून १० मे पर्यंत निवडणुक अर्ज दाखल करण्यात येणार आहे १४ मे रोजी  उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.२८ मे सोमवारला मतदान तर ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक होणार किंवा नाही यासंदर्भात विविध चर्चांना ऊत आले होते. यादरम्यान उच्च न्यायालयात याबाबत याचीका रद्दबातल केल्यानंतर निवडणूक तारखांची घोषणा होईल, असे वाटत होते. गुरुवारी या चर्चेला पुर्णविराम मिळाला.
यासंदर्भात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी गुरूवारी सायंकाळी पत्रपरिषद घेवून पोटनिवडणुकीची प्राथमिक माहिती दिली. यात ३ मे रोजी अधिसूचना जाहिर करण्यात येत असून याच तारखेपासून नामनिर्देशन अर्ज भरण्याला प्रारंभ होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत १० मे असून ११ तारखेला नामनिर्देशन अर्जांची छाणनी करण्यात येणार आहे. १४ मेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. २८ मे रोजी मतदान तर, ३१ मे रोजी मतमोजणी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात प्रथमच लोकसभा निवडणूकीला मतदानात ‘व्हिव्हीपीएटी’चा वापर ईव्हीएम करण्यात येणार आहे. यात मतदाराला मतदान केल्यानंतर या मशिनीवर आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केले आहे, याची खात्री करुन घेता येणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी १ जानेवारी २०१८ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले. आदर्श आचार संहिता लागू झाली असून याचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे असेही जिल्हाधिकाºयानी स्पष्ट केले. यासंदर्भांत शुक्रवारी भंडारा व गोंदिया जिल्हाधिकाºयांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असून निवडणूकीबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, निवासी उपल्हिाधिकारी विजय भाकरे, अप्पर उपजिल्हाधिकारी दिलीप तलमले आदी अधिकारी उपस्थित होते.

Share