मुख्य बातम्या:

रेतीच्या अवैध वाहतूकीमुळे प्रवाशांची कोंडी,वाहतूक पोलीसाची मागणी

 बिलोली,दि.27ः-  तालुक्यातील  सगरोळी व बोळेगाव येथील मांजरा नदीपात्रातुन गेल्या दोन माहिण्यापासुन दिवसरात्र रेतीची अवैध वाहतुक केली जात असून ही वाहतुक
मुख्यतः हिप्परगा(थडी), केसराळी, खतगांव, आदमपुर मार्ग कर्नाटक राज्यात होत आहे. या वाहतूकीमुळे प्रवाशाहसह छोटे मोठे वाहतुकदार आणि रस्त्यालगतच्या रहिवाश्यांना
मोठा त्रास सहन करावा लागत आहे, या त्रासदायक वाहतूकीतुन सुटका करण्यासाठी या मार्गावर वाहतुक पोलीसाची नियुक्ती करावी अशी मागणी निवेदनाव्दारे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघटनचे प्रदेश सरचिटनिस राजेन्दर पाटील शिंपाळकर, महिला जिल्हाध्यक्ष सौ.मेघा स्वामी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार बाबुराव इंगळे, तालुका अध्यक्ष सतिश बळवंतकर यांनी पोलीस अधिक्षक नांदेड यांच्याकडे केली आहे.त्या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी,उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली यांनाही देण्यात आली आहे.
Share