नाना पटोलेंना सहदेण्य़ासाठी भाजपचे राजकुमार बडोलेच ठरु शकतात पर्याय?

0
21

पटोलेंसाठी काँग्रेसकडून दबाव,राकाँत फुंडे,शिवणकर तर भाजपात पटले,बोपचेत चुरस

काँग्रेसमध्ये नाना पटोलें प्रबळ उमेदवार, राष्ट्रवादीत सुनिल फुंडे,विजय शिवणकर,मधुकर कुकडे

भाजपात डाॅ.परिणय फुके,डाॅ.खुशाल बोपचे,हेमंत पटले,शिशुपाल पटले व एड विरेंद्र जायस्वाल रिंगणात

गोंदिया,दि.27(खेमेंद्र कटरे) – नाना पटोले यांच्या खासदारीकीच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर गुरुवारी जाहीर झाली. २८ मे रोजी मतदान आणि ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची घोषणा होताच दोन्ही जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.निवडणुकीची घोषणा होताच  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेतकरी विरोधी व ओबीसी विरोधी सरकार असल्याची तोफ डागून खासदारकीचा राजीनामा देणारे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदासंघाचे माजी खासदार नाना पटोले यांनाच कॉंग्रेसने उमेदवारी द्यावी यासाठी दबावगट तयार केला गेला आहे.त्यातच हा मतदारसंघ सध्याच्या घडीला राष्ट्रवादीकडे आहे.जर या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून हा मतदारसंघ काँग्रेसने हिसकावला तर भविष्यात खासदार प्रफुल पटेल यांचे राजकारण संपल्यातच जमा राहणार आहे.त्यामुळे पटेल हा मतदारसंघ काँगेसला सहजासहजी मिळू देणार नाही.त्यामुळेच की काय आज शुक्रवारला प्रफुल पटेल यांनी नागपूरात येऊन राष्ट्रवादीच्या दोन्ही जिल्ह्यातील बैठक घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली.

भाजपला नाना पटोलेंना सह देण्यासाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व गोंदियाचे पालकमंत्री इंजि.राजकुमार बडोले हे सुध्दा एक चांगले सक्षम उमेदवार ठरू शकतात.त्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जनतेसाठी केलेले कार्य आणि त्यांच्या कार्यकाळात भाजपला मिळालेले नगरपंचायत व जि.प.निवडणुकीतील यशाचा विचार पक्षाने नक्की करायला काहीही हरकत नाही.सोबतच जर आर्थिक मजबूत उमेदवार म्हणून भाजप माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांचा नावाचा विचार पक्षाने करायला काहीही हरकत नाही.ज्या पध्दतीने गोंदिया विधानसभा मतदारसंघात भाजपला त्यांनी जिवंत केले आहे.त्यांच्या का्र्यकुशलतेमुळे नगरपरिषदेत आलेली सत्ता आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायतीवर भाजपचे आलेले वर्चंस्वासोबतच दोन्ही मतदारसंघात असलेली त्यांची ओळख व संबध भाजपला लाभदायक ठरू शकते अशा चर्चां सुरु झाल्या असून भाजपने या दोन उमेदावरापैकी एकालाही पटोले निवडणुक लढत असतील तर रिंगणात उतरविल्यास पोटनिवडणुक लक्षवेधणारी ठरु शकते यात शंका नाही.

राष्ट्रवादीने हा मतदारसंघ सोडला नाही तर काँग्रेसचे नाना पटोलेंना आघाडी धर्म म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करावाच लागणार आहे.राष्ट्रवादीकडून भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांचे नाव आघाडीवर आहे.फुंडे जर उमेदवार राहिल्यास नाना पटोलेसह काँग्रेसचे नेते त्यांना तनमनाने सहकार्य करु शकतात.त्यातच पटोलें व फुंडेची मैत्री कुणापासूनही लपून राहिलेली नाही.सहकार क्षेत्रात सुनील फुंडे यांचे वजन आहे. जिल्हा मध्यतर्वी बँकेचे ते बर्‍याच वर्षांपासून अध्यक्ष आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात सहकार महर्षी म्हणून ते ओळखले जातात. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या पहिल्या फळीतील ते आहेत. गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवनकर व माजी आमदार मधुकर कुकडे यांचीही दावेदारी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आहे.फुंडे एैवजी गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर यांनाही उमेदवारी मिळाली तर भाजपचे काही नाराज हे शिवणकरांना अप्रत्यक्ष मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची असून भाजपने ईच्छुकांच्या जेव्हा मुलाखती नागपूरच्या विभागीय कार्यालयात घेतल्या.त्यावेळी सर्वच इच्छुक उमेदवांरानी पक्ष जो उमेदवार देईल त्यासाठी काम करु मात्र आमच्याकडे पैसा नाही,पक्षाने निवडणुकीचा खर्च करावा अशी अट घातल्याने भाजपनेही खर्च करण्याचे नियोजन केल्याची चर्चा आहे.वास्तविक 2019 च्या निवडणुका लक्षात घेऊनच उमेदवार देण्यात येणार आहे.2019 च्या निवडणुकीसाठी भाजपने कुणबी चेहरा म्हणून आमदार डाॅ.परिणय फुके व भंडारा नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांच्यावर फोकस करुन ठेवले असले तरी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भंडारा जिल्ह्यात दर दोनदिवसांनी होणारा दौरा भविष्यातील निवडणुकात महत्वाचा ठरणार आहे. या पोटनिवडणुकीत कुणबी चेहरा म्हणून आमदार परिणय फुके पहिली पंसती आहे,जर फुके यांनी नकार दिला तर भाजप पोवार समाजातील उमेदवार रिंगणात उतरवेल.माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,माजी खासदार शिशुपाल पटले व माजी आमदार व भाजप गोंदिया जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांची नावे सध्या आघाडीवर आहेत.त्यातच भाजप ओबीसी आघाडीचे एड विरेंद्र जायस्वाल यांनीही उमेदवारी मागितली आहे.त्यांनी वकीलीपेसापासून दोन्ही जिल्ह्यात बहुसंख्येने असलेल्या कलार जातीला प्राधान्य मिळेल असेही भाजपकडे म्हटल्याची माहीती समोर आली आहे.भाजपने जायस्वाल यांना उमेदवारी नाकारल्यास ते एैनवेळेवर जो निर्णय घेतील त्यात भाजपला मात्र काहीप्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण विद्यमान एकाही आमदाराने होकार दिलेला नाही.त्यामुळे पक्ष विचार करतांना बोपचे यांना जर उमेदवारी दिली तर 2019 चे ते प्रबळ दावेदार असतील त्यावेळी त्यांना नाकारणे धोकादायक ठरू शकते हे अंतर्गत कारण पुढे करुन त्यांच्याएैवजी माजी आमदार हेमंत पटले यांचा नावाचा विचार करुन त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल अशी शक्यता आहे.पटले जर पोटनिवडणुकीत निवडूनही आले तर 2019 मध्ये ते प्रबळ दावेदारी न करता अल्पकालावधीतील खासदार म्हणून समाधानी राहू शकतात हा पक्षाचा विचार आहे.त्यातच शिशुपाल पटले हे सुध्दा रिंगणात असले तरी सध्या त्यांच्यानावावर पाहिजे तसा प्रतिसाद नसल्याची सुत्रांची माहिती आहे.काँग्रेसने जर पटोलेंना उमेदवारी जाहिर केली तर भाजप त्यांच्याविरोधात बोपचेंना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवून ओबीसीसांठी लढणार्या दोन्ही नेत्यांना एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनविण्याचा डाव भाजपची मातृसंघटना खेळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

शिवसेनेकडून भंडार्‍याचे जिल्हाध्यक्ष इंजि. राजेंद्र पटले यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे.राजेंद्र पटले यांनी सातत्याने शेतकरी मुद्यावर आक्रमक भूमिका ठेवत आंदोलन सुरुच ठेवले आहे.शिवसेनेकडे त्यांच्याशिवाय दुसरा मतदारही सध्यातरी दिसून येत नाही.गोंदियाचे शिवसेना जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे यांनी लोकसभेएैवजी विधानसभामतदारसंघावर नजर ठेवली आहे.या मतदारसंघात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात कुणबी, पोवार, तेली, एससी, लोधी व कलार समाज प्रमुख घटक आहेत.जातीय राजकारणात पोवार व कुणबी हे एकमेकांचे राजकीय शत्रुच असल्यासारखे वागत असल्याने हे दोन्ही एकत्र येण्याची शक्यता कमी आहे.