मॉडेल कॉन्वेटमध्ये उन्हाळी शिबिराचा समारोप

0
17

गोरेगाव,दि.२८: स्थानिक मॉडेल कॉन्वेंटमध्ये ११ ते २६ एप्रिल २०१८ पर्यंत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये योगा, स्पोकन इंग्लीश, व्यक्तिमत्व विकास, अबॅक्स, अक्षर सुधार, नृत्य अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्याथ्र्यांनी या शिबिरात सहभागी होऊन सर्व विषयांचे सखोल ज्ञान प्राप्त केले. विद्याथ्र्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. २६ एप्रिलला या शिबिराचा समारोप कार्यक्रम मॉडेल कान्व्हेंट गोरेगावचे संस्थापक प्रा.आर.डी.कटरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संचालिका श्रीमती सुरेखा आर.कटरे, मुख्याध्यापिका छाया पी.मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.शिबिराच्या माध्यमातून शिकलेल्या सर्व गोष्टी आपल्या विद्यार्थी जीवनात उतरवून त्यानुसार शिक्षण घेण्याचे प्रयत्न करावे असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.आर.डी.कटरे यांनी केले.या शिबिरामध्ये एकूण ६३ विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला. या सहभागी विद्याथ्र्यांपैकी निवडक विद्याथ्र्यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. यात योगामध्ये अवनी वाय. रहांगडाले प्रथम, कुशल सुरेंद्र पटले द्वितीय, हिमांशू एम. गौतम तृतीय, स्पोकन इंग्लीशमध्ये लक्की डी. चौधरी प्रथम, ग्रिष्मा आर. कामधे द्वितीय, कार्तिक टेकचंद इळपाचे तृतीय, व्यक्तिमत्व विकासमध्ये अनन्या आर. डोंगरे प्रथम, जान्हवी बी.राऊत द्वितीय, एकता एम.पटले तृतीय, अ‍ॅबक्ममध्ये भविष्य एम. हरिणखेडे प्रथम, खेजल डी.येळे द्वितीय, चित्रांश व्ही. तुरकर तृतीय तसेच नृत्यामध्ये खामक्ती एस. लांजेवार, खाणीम पी.राऊत, पारस पी. रहांगडाले, कनक एम. गजघाटे प्रथम,द्वितीय व तृतीय तसेच गेम्समध्ये सिद्वी वी. हरिणखेडे, सृष्टी आर. मिश्रा, इशांत जी. खोब्रागडे, अंशुल एम.कटरे यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. संचालन पदमाकर महाजन यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी रश्मी अग्रवाल, योगेन्द्र बिसेन, विवेक जैन, शालिनी डोंगरे तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.