एसआरपीएफच्या पोलिस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

0
9

गडचिरोली,२८  पोलिस मुख्यालयानजीक असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या लघु मुख्यालयात  कार्यरत पोलिस उपनिरीक्षकाने स्वतःवर बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज २८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.राजेंद्र इंगळे (५३)  असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. इंगळे हे एसआरपीएफच्या गट क्रमांक ४ मध्ये कार्यरत होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याबाबत माहिती मिळू शकली नाही. घटनेचा तपास गडचिरोली शहर पोलिस करीत आहेत.