३ गुन्ह्यात अडकलेला शालीकराम डोलारे ७ जिल्ह्यातून हद्दपार

0
14

गोंदिया,दि.२८ः-रामनगर पोलीस ठाणेहद्दीतील आरोप शालीकराम डोलारे २ वर्षासाठी गोंदियासह शेजारील जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा निर्णय उपविभागीय दंडाधिकारी यांनी घेतला आहे.विविध गुन्ह्यामध्ये तसेच गावात राहून दहशत निर्माण करुन शांतता भंग करीत असल्याप्रकरणी हद्दपार करण्याचा प्रस्ताव रामनगर ठाण्याचे पोलीस निरिक्षकानी सादर केला होता.शालीकराम डोलारे विरुध्द ३ गुन्हे दाखल असून ते न्यायालयात प्रलबिंत आहेत.त्यातच पोलीसांनी कारवाई करुन सुध्दा डोलारेने आपल्यात सुधारणा केली नसून त्याच्या सवयीमुळे लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली असल्याने व मालमत्तेस धोका असल्याने त्याच्याविरुध्द सर्वसामान्य व्यक्ती साक्ष देण्यास पुढे येत नाही.त्यामुळे शालीकराम डोलारेविरुध्द हद्दपारची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती.त्या शिफारशीला मान्य करीत शालीकराम डोलारे रा.न्यु लक्ष्मीनगर गोंदिया यास गोंदिया,बालाघाट,राजनांदगाव,चंद्रपूर,गडचिरोली ,भंडारा व नागपूर जिल्ह्यातून २ वर्षाकरीता हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.या दरम्यान आरोपी डोलारे ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत वास्तव्य करेल त्या पोलीसस्टेशनमध्ये दर महिन्याच्या ५ तारखेला हजेरी लावून आपला राहण्याच्या पत्याची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.तसेच सदर आरोपीला रामनगर पोलीसांनी हद्दपार जिल्ह्याबाहेरील पोलीस स्टेशनमध्ये नेवून त्याची नोंद घेण्याचे निर्देश दिल्याने रामनगरचे पोलीस निरिक्षक देशमुख यांनी हद्दपार आरोपी शालीकराम डोलारेला ताब्यात घेत हद्दपार कारवाई नोटीसाची अमलबजावणी केली आहे.