6 शिकाऱ्यांना अटक; रायफलसह काडतूसे जप्त

0
13

दिग्रस,दि.29 : दिग्रसच्या वन विभागाला पक्की माहिती मिळताच २७ व २८ एप्रिलच्या मध्यरात्री एकच्या सुमारास सापळा रचुन ६ वन्यजीव शिकाऱ्यांवर झडप घालून त्यांच्या जवळील १ रायफल, २ जिवंत काडतुस, ३ वापरलेली काडतुसे, २ सत्तुर व २ चाकू सह ६ मोबाईल, १ कार व ३ दुचाकी असे आरोपींकडून जप्त करण्याच्या कारवाईने चांगलीच खळबळ उडाली असुन. वन विभागाच्या या धडक कार्यवाहीने जंगलचोर व शिकार्यांचे धाबे दणाणले आहेत.

दिग्रसपासून २० कि.मी..अंतरावर असलेल्या डेहणीवर्तुळ वडगांवबीट परिसरातील जंगलात निसार अजगर अली तंवर, शे.हुसेन शे. महेबुब, म. सलीम हाजी अयुब हे तिघे सदोबा सावळीचे व म. फारुक पारेख, म. अनीस अ.रज्जाक व शे. वजीद शे.गुलाम हे तिघे कलगावचे हे सहा वन्यजीव शिकारी शिकार करण्याच्या उद्देशाने मध्यरात्रीला भटकत होते. यांच्या हालचालीची खबर दिग्रसचे वनपरिक्षेत्राधिकारी आनंद धोत्रे यांना मिळाली. आपल्या वनपाल व वनरक्षक यांच्या टिम बरोबर वडगांवला पोहचले व शिका-यांचा मागोवा घेऊ लागले अस्यात  तिन दा बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचा आवाज झाला. त्या दिशेने वनपरिक्षेत्राधिकारी व त्यांची टिम गेली आणि सशस्त्र शिकाऱ्यांवर झडप घातली.या झडपडीत क्षेत्र सहाय्यक गुलशर खॉ.रहिम खॉ.पठाण यांच्या छातीला शिका-याच्या हातचा सत्तुर लागल्याने व सोबतचा वनरक्षक अश्विन मुजमुले हे जख्मी झालेत. जिवाची पर्वा न करता वनअधिकारी व करमीचारयांनी ६ शिका-यांचे मुचके बांधून त्यांना ताब्यात घेण्यात यश आले दरम्यान झटापटीत १ आरोपी पसार झाला. शस्त्रात्र व मोबाईलसह एम.एच.२९ एस.सी.१८८८ क्र‘. टोयोटो कार व ३ मोटारसायकली वन विभागाने ताब्यात घेतल्या.  क्षेत्र सहाय्यक प्रकाश जाधव, अनिल सोनोने, वनपाल रफिक अहेमद ,संतोष जाधव, वनरक्षक गौतम बरडे, संतोष बदुकले,अनिल इंगोले, अयुब पठाण,अनिल राठोड, अमीर पठाण व वनमजुर आदींनी मोलाची कामगिरी बजावली.