परिक्षण भूमापक एसीबीच्या जाळ्यात

0
21

तिरोडा,दि.२९ :: तक्रारदाराने गावठाण मधील निवासी उपयोगाची जागा आपल्या मुलाच्या नावावर फेरफार करण्याकरिता उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय तिरोडा येथे अर्ज करण्यात आले. त्यानुसार जागेच्या फेरफार झाले की नाही याबाबत विचारपूस करण्याकरिता भूमी अभिलेख कार्यालयात येथे जाऊन संबंधित परिक्षण भूमापक सुरेश भुरे यांना विचारपूस केली असता तक्रारदाराला ३००० रुपयांची मागणी परिक्षण भूमापक यांनी केली. त्यावरून दिनांक २३ एप्रिल रोजी सुरेश भुरे यांना रंगे हाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. सदर जागेची फेरफार करण्यासाठी सुरेश भुरे परिक्षण भूमापक यांनी ३००० रुपयांची लाच स्विकारल्यावरून आरोपी सुरेश भुरे परिक्षण भूमापक यांच्या विरुद्ध कलम ७, १३ (१) (ड), सहकलम १३(२) लाच लुचपत प्रतिबंध कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचे तपास सुरू असून कामगिरी पी.आर.पाटील पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली रमाकांत कोकाटे पोलीस उपअधिक्षक, दिलीप वाढणाकर, प्रमोद चौधरी पोलीस निरीक्षक, दिवाकर भदाडे, राजेंद्र शेंद्रे, रंजित बिसेन, दिगंबर जाधव, नितीन रहांगडाले, वंदना बिसेन व देणानंद मारवते यांनी केली आहे.