शाळा परिसरातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे पुन्हा सर्व्हेक्षण करणार

0
28

अमरावती,दि.30 :  जिल्ह्यातील नादंगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील मतीन भोसले यांच्या अध्यक्षतेखालील संस्थेच्या प्रश्नचिन्ह या शाळेच्या आवारातून समृद्धी महामार्गसाठी 20 गुंठे जागा शासनाला अधिग्रहित करावी लागणार आहे. त्यामुळे शाळेचे विद्यार्थीयांचे नुकसान होऊ नये अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी केली होती.त्यावर मुख्यमंत्र्यांनी जागेचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाने भेट घेतली तेव्हा दिले.

मुख्यमंत्र्यांची मतीन भोसले व त्यांच्या पदाधिकारी सहित सरचिटणीस गजानन कोल्हे, सोपान गुडधे, शिवा पाटील यांच्या समवेत भेट घेऊन नागपूर येथील रामगिरी या त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी प्रश्न समस्या समजून घेत असलेली जागा जैसे थे ठेवण्याला सर्वोच्च प्राथमिकता असून त्यासाठी नव्याने सर्व्हेक्षण करण्याचे आदेश संबंधितांना आजच देण्यात येतील असे मुख्यमंत्री म्हणाले.मतीन भोसले यांचे पारधी मुलांना समाजाच्या मुख्य धारेत आणण्याचे कार्य अत्यंत महत्वाचे असून त्यांच्या या कार्याबद्दल मला नम्र जाणीव आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.