मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

मुदखेडमध्ये 300 जणांना विषबाधा

नांदेड,दि.30ः – मुदखेड येथील नई आबादी परिसरात एका लग्नात बिर्याणी खाल्ल्याने  300 जणांना विषबाधा झाली आहे. यातील  16 रूग्णांना अतिदक्षता म्हणून नांदेडच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की.  नईआबादी या मुस्लिम वसाहतीत एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विवाहानंतर जेवणात  वर्हाडी मंडळींनी बिर्याणी खाल्ली. त्यानंतर सायंकाळपर्यंत अनेकांना त्रास होऊ लागल्याने एकेक करून रूग्ण स्थानिक शासकीय रूग्णालयात दाखल होऊ लागले. सायंकाळपर्यंत ती संख्या तीनशेवर पोहोचली. त्यातील गंभीर अशा १६ रूग्णांना पुढील उपचारासाठी नांदेडला रेफर करण्यात आले.दरम्यान, एवढ्या मोठ्या संख्येने दाखल झालेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी येथील ग्रामीण रूग्णालयात पुरेसे डाॅक्टर्स, परिचारिका व इतर स्टाफ उपलब्ध नसल्याने रूग्णांचे हाल झाले. त्यातच रूग्णालयाचे अधिक्षक संजय मनातकरही अद्यापपर्यंत रूग्णालयात पोहोचले नव्हते. ते चार दिवसांपासून रजेवर असल्याचे समजते. शहरातील खासगी रूग्णालये व लष्कराच्या सीआरपीएफ रूग्णालयातील सर्व डाॅक्टर्स मात्र सेवेसाठी उपस्थित आहेत.

Share