मुख्य बातम्या:

काबुल दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरले

काबुल,दि.30(वृत्तसंस्था)- अफगाणिस्तानची राजधानी काबुल आज (सोमवार) सकाळी दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरली. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका पत्रकाराचा समावेश आहे. जवळपास 30 जण जखमी झाले आहेत.पहिला स्फोट शसदरक भागात झाला तर दुसरा स्फोट याच भागात असलेल्या NDS इंटेलिजन्स सर्व्हिस ऑफिसजवळ झाला. या स्फोटात सर्वाधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात पत्रकार आणि NDS कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

टोलो न्यूजनुसार, स्फोटात एएफपीच्या एका फोटॉग्राफरचा मृत्यू झाला आहे. पत्रकार प‍हिल्या स्फोटाचे रिपोर्टिंग करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते. तितक्यात दूसरा स्फोट झाला. अद्याप या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.काबुलमध्ये झालेले स्फोट आत्मघातकी असल्याचे काबुल पोलिसांनी म्हटले आहे. काबुलचे पोलिस प्रमुख चीफ दाऊद आमीन यांनी एएफपीला सांगितले की, स्फोटात मृत्यूमुखी पडलेले आणि जखमी झालेले सर्व सामान्य नागरिक आहेत. गृह मंत्रालयाच्या प्रवक्ता नजीब दानिश यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.दरम्यान, गेल्या आठवड्यात काबुलमध्ये मतदार नोंदणी केंद्राजवळ झालेल्या स्फोटात 60 जणांचा मृत्यू झाला होता.

Share