जीवनाचा खरा सार राष्ट्र संताच्या ग्रामगीतेत-आचार्य हरिभाऊ वेरूळकर

0
17

अर्जुनी मोरगाव,दि.30 : वंदनीय राष्ट्रसंताची ग्रामगीता गावखेड्यातील सामान्य ग्रामनाथाला अर्पण केली आहे. ग्रामगीतेमध्ये सांगीतल्या प्रमाणे राष्ट्राचे भविष्य घडविण्यासाठी सुसंस्कारीत बालक तयार करण्याचे प्रशिक्षण राष्ट्रधर्म प्रचार समिती गुरुकुंज मोझरीद्वारे प्रशिक्षीत शिक्षक करीत आहेत. सर्वधर्म समभावाची शिकवण देणारी ग्रामगीता विज्ञानावर आधारीत आहे. या प्रशिक्षणातून घडणारे बालक स्वत:चे व राष्ट्राचे भविष्य उज्वल करणार असून जिवनाचा खरा सार राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रधर्म प्रचार समितीचे (गुरुकुंज मोझरी)े आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांनी केले.
ग्राम खांबी येथील १० दिवसीय प्रशिक्षण शिबिराला त्यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी लाठीकाठी, मल्लखांब, बौद्धीक व शारीरिक वर्गाचे अवलोकन करुन समाधान व्यक्त केले. तर सायंकाळी सामुदायीक प्रार्थनेनंतर सुसंस्कारी शिबिरातील मुलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या वेळी त्यांनी तुकडोजी महाराजांच्या सोबतीच्या जीवनातील आठवणींना उजाळा दिला. पाप आणि पुण्य मला मोजता येत नाही. यज्ञात किती तुप जाळल्याने पुण्य घडते हे सुद्धा मला निश्चित सांगता येत नाही. परंतु बालके शिबिराच्या माध्यमातून सुसंस्कारीत केले तर निश्चितच पुण्य लाभते, हा माझा ठाम विश्वास असल्याचे ते म्हणाले. संस्कृत व मराठी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या गुुरुजींनी या वेळी ग्रामगीतेवर सखोल कथन केले.
अठराव्या वर्षी हिमालयातील गुरुकुलात संस्कृत शिकून राष्ट्रसंतांचे सानिध्य आणि संस्कारीत राष्ट्र घडविण्यासाठी १९८१ पासून पहिल्या सुसंस्कार शिबिरातील १८ मुलांपासून सुरु केलेल्या शिबिरात दरवर्षी महाराष्ट्रात ६० शिबिरात हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
वयाचे ८५ वर्षे ओलांडलेल्या आचार्य वेरूळकर गुरुजींनी १२ ते १८ वयोगखालील शिबिरातील मुला-मुलींना मित्रहो या शब्दांनी हाक दिली. यावेळी राष्ट्रहितासाठी काम करण्यासाठी आपण प्रशिक्षीत होवून राष्ट्रधर्म जागवावे, सुजान, सज्ञान होवून आई-वडील व देशाची सेवा करावी असा मौलिक संदेश दिला.
कार्यक्रमाला साबळे महाराज, संकेत काळे महाराज, किशोर रायबोले, रुषल पांडे, गणेश बोदडे, पवन धानोरकर, रवी गायकवाड, दुर्योधन मैद, जि.प.सदस्य कमला प्रमोद पाऊलझगडे, समर पचारे, प्रफुल कपले, विजयसिंह राठौड, खांबीचे सरपंच प्रकाश शिवणकर, शिबिर प्रमुख कृष्णकांत खोटेले, जयंत खोटेले, उध्दव मेहेंदळे, भोजराम रहेले तसेच शिबिरार्थी व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.