लाखनीत ट्रकने चिरडले 8 वèहाडाना, 15 जण गंभीर

0
23

भंडारा,दि.३०ः-जिल्ह्यातून जाणाèया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील लाखणी येथील कुमार पेट्रोलपंपाजवळील ग्रेसलॅण्ड सेलिब्रेशन हॉल व लॉन समोर आज सायकांळी ८ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात लग्नात सहभागी असलेल्या वèहाड्यांच्या (एमएच 31डीके 9789) या गाडीला ट्रकने चिरडल्याने 8 वèहाडी घटनास्थळीच ठार तर 15 ते 17 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.सविस्तर असे की लग्न लावल्यानंतर हाॅलबाहेर वर्हाडी उभे रस्त्यावर होते.तेवढ्यातच राष्ट्रीय महामार्गावरुन रायपूरच्या दिशेने येत असलेला ट्रेलर नागपूरकडे जात असताना वाहनचालकाचे नियंत्रण सुटले व वर्हाड्यांच्या अंगावार गेला.ग्रेस लॅंड सेलिब्रेशन सभागृहात लाखनी येथील जगनाडे कुटुबियांच्या येथील लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते.नागपूर येथून हरगुडे कुटुंबातील सदस्य लग्नाची वरात घेऊन आलेले होते.लग्न लावल्यानंतर काही वर्हाडी हे रस्त्यालगतच किनार्यावर उभे असतानाच ट्रेलर क्रमांक डब्लूबी 11 डी 3411 च्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि नवरदेवाच्या व्हेगनार गाडीला ठोकरमारत वर्हाडाच्या अंगावर चढल्याने 8 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.जखमींना लगेच लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातानंतर नागरिकांनी एकच आक्रोश करीत चक्काजाम केल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती.ट्रेलरचालक मात्र घटनेनंतर घटनास्थळीच ट्रेलरसोडून फरार झाला असून ट्रेलरची नागरिकांनी तोडफोड केली आहे.घटनास्थळावर अद्यापही तणावपुर्ण परिस्थिती असून पोलीस परिस्थितीला हाताळण्याचे प्रयत्न करीत आहेत.अमित लांडगे (30), रोहित बांडेबुचे (27, रा.नागपूर), देवांशु भुसारी (5, रा. खोकरला) यांच्यासह 7 जणांची ओळख पटली नाही

ट्रक हा नागपूरकडे जात असताना रस्त्यावरील गर्दीमुळे त्या वाहनाला वाचविण्याचा प्रयत्नात ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. लाखनी येथील या लग्नसमारंभात सहभागी झालेल्या एका वèहाडी मित्रांने बेरार टाईम्सला घटनेची माहिती दिली.या अपघातामूळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक गेल्या एक ते दीड तासापासून खोळबंली गेली आहे.ठार झालेले वèहाडी हे वर्धा व नागपूर जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.