मुख्य बातम्या:

टाकरखेडा मोरे गावच्या पूनम ठाकरेचे युपीएससी परिक्षेत सुयश

अमरावती,दि.30ः-केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (Union Public Service) परीक्षेत अखिल भारतातुन 723 वा क्रमांक पटकावून अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या कु.पूनम ठाकरे हिचा शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षक महासंघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष मनोज कडू ,प्रदीप येवले,राजुभाऊ बारब्दे, शिक्षक महासंघाचे अंजनगाव सुर्जी शहराध्यक्ष प्रमोद मोरे उपस्थित होते.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केल्यामुळे पूनम ठाकरे हिच्या कामगिरीमुळे असंख्य तरुण तरुणी तिच्यापासून प्रेरणा घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेस प्रविष्ठ होतील व स्पर्धा परीक्षेत मराठी मुलांचा टक्का निश्चितच वाढेल.
टाकरखेडा मोरे हे गाव अंजनगाव सुर्जी पासूनच काही किमी अंतरावर आहे.हे एक खेडे गाव असुन ग्रामीण भागातून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी पूनम ठाकरे ही असंख्य विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान बनली आहे.तिच्या या कामगिरीचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत असुन कु. पुनम ठाकरे हिने महाराष्ट्राच्या पर्यायाने अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याचे मत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी व्यक्त केले आहे.

Share