पानलाईनमध्ये भीषण आग,हॉटेल,पादत्राणे व कपडा दुकानांची राखरांगोळी

0
30

गोंदिया,दि.30ःः- येथील शकंरगल्लीकडे असलेल्या भाजीबाजारातील पानलाईनला आज पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.ही आग कशामुळे लागली याचा अद्यापही उलगडा झाला नसून आग विझविण्यासाठी गोंदिया नगरपरिषद,अदानी व भंडारा येथील नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.अग्निशमन गाड्यांना यावेळीही अतिक्रमीत गल्या व रस्त्यामुळे आग विझवितांना अडचणींना सामाेरे जावे लागल्याचे चित्र बघावयास मिळाले.शहरातील हॉटेल बिंदल प्लाजा ला आग लागून ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना २१ डिसेंबर २०१६ मध्ये घडली. या घटनेला आता दीड वर्षांच्या कालावधी पूर्ण होत आहे. मात्र यानंतरही नगर परिषदेच्या अग्नीश्मन विभागात सुधारणा झालेली नाही. बिंदलच्या घटनेनंतरही प्रशासनाने धडा घेतला नसल्याचे चित्र आज पुन्हा बघावयास आहे.
पान लाईनमधील दुकांनाना सोमवारी पहाटेच्या सुमारास लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमन विभागाला पाणी आणण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागल्याचे उपस्थितांनी सांगितले.अग्नीशमन विभागाच्या चार वाहनाना वांरवार पाणी भरुन आणण्यासाठी गणेशनगर येथील अग्नीशमन विभागाच्या कार्यालय परिसरात जावे लागले.
आग आटोक्यात आणण्यासाठी या चार वाहनानी २३ फेºया मारल्या. मात्र यात अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना शहरातील अरुंद रस्ते आणि गल्यांमुळे चांगलीच अडचण झाली. यावरुन पुन्हा शहरातील अतिक्रमणाची समस्या अद्यापही कायम असल्याने अग्नीशमन विभागाचे वाहन घटनास्थळी पोहचण्यास मोठी अडचण निर्माण होत असल्याचे समोर आल्याने ज्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले अशा व्यवसायिक व नेत्यांनी किमान आत्ता तरी जागे होऊन अतिक्रमण काढणार काय अशा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

.गेल्या काही वर्षापुर्वी याच परिसरातील होटल बिंदल प्लाझामध्ये आग लागली होती.आता त्याचपरिसरातील भाजी बाजारात आग लागली आहे.10 वर्षापुर्वी सुध्दा याच भाजीबाजारात आग लागून दुकाने राख झाली  होती. आज मध्यरात्री ला १:३० वाजताच्या सुमारास लागलेली ही आग अखेर पहाटे ५ वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आली असून घटनास्थळाचा पाहणी अग्निशमन दल,पोलीस विभाग व वरिष्ठ अधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधींनी सुरवात केली. आज लागलेल्या आगीत विरेन चौरसिया यांच्या चुना दुकानाचे १लाख ४० हजार,सुरज चौरसिया यांच्या समोसा हॉटेल दुकानाचे १ लाख ७५ हजार,शेखर चौरसिया यांच्या समोसा हॉटेल दुकानाचे १लाख ७० हजार , लेखराज सहारे
यांच्या चहा दुकानाचे ९५ हजार,व्यंकट चौधरी यांच्या कुकर रिपेरिंग दुकानाचे  ३लाख ५० हजार,छेदिलाल चौरसिया यांच्या गोडाउन मधील सामानाचे २ लाख ४० हजार ,अरूणकुमार चौरसिया यांच्या पान दुकानाचे २लाख१० हजार, संजय चौरसिया यांच्या ऑनलाईन दुकानाचे २ लाख ५० हजार,राजेंद्र चौरसियायांच्या दुकानाचे  ५ लाख, लेखराज गोपलानी यांच्या फुटवेयर दुकानचे  ४ लाख ५० हजार, प्रवीण प्रभुदास बजाज यांच्या कपडा दुकानाचे १४ लाख ५० हजार,ममता गोपलानी यांच्या फुटवेयर दुकानाचे ६ लाख ५० हजार,विरभान माधवानी यांच्या बुट हाउस दुकानाचे ६ लाख, पूरण गोपलानी यांच्या बूट हाउस दुकानाचे ५ लाख,विजय चौरसिया यांच्या खालीदुकानाचे १ लाख ७० हजार ,जय हिरालाल चौरसिया यांच्या पान दुकानाचे ४ लाख असे एकूण  ६४ लाख ५० हजार रूपयाचे प्राथमिक नुकसान -झाल्याचा अंदाज अप्पर तहसीलदार गोंदिया यांनी दिला आहे. सदर आग
लागलेल्या दुकानाची आग विझविण्यात आली असली तरी आगीची धग मात्र दुकान परिसरात कायम आहे. करिता संपूर्ण सामान्य झाल्यानंतर अंतिम पंचनामा तयार
करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.