भाजपा-शिवसेना एकत्र लढवणार विधानपरिषद निवडणूक

0
88

मुंबई,दि.2(विशेष प्रतिनिधी)- सत्तेत आल्यापासून  गेली साडेतीन-चार वर्षं भाजपाशी कडाडून भांडणाऱ्या, सत्ता सोडण्याचे इशारे देणाऱ्या आणि स्वबळाचा नाराही देणाऱ्या शिवसेनेने आज आपल्या ‘जुन्या मित्रा’ला टाळी देऊन सगळ्यांना धक्का दिला आहे. या महिनाअखेरीस होणारी विधानपरिषद निवडणूक भाजपा आणि शिवसेना एकत्र लढवणार आहेत. त्यामुळे २०१९च्या निवडणुकांमध्येही त्यांची युती होणार का, यावरून चर्चा सुरू झाली आहे.

विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, भाजपचे दोन आणि काँग्रेसचा एक सदस्य विधानपरिषदेतून मे आणि जून अखेर निवृत्त होत असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने ही निवडणूक जाहीर केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून हे सहा प्रतिनिधी विधानपरिषदेवर जाणार आहेत. विधानपरिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, उस्मानाबाद-लातूर-बीड , परभणी-हिंगोली, अमरावती आणि चंद्रपूर या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांत ही निवडणूक होत आहे.